एका उपविभागीय दंडाधिकारी महिला अधिकाऱ्याची तिच्या पतीने हत्या (Husband Killed Wife) केलीय. पत्नीने तिच्या सर्व्हिस रेकॉर्ड, विमा पॉलिसी आणि बँक खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून समावेश न केल्यामुळं तिचा खून करण्यात आला, असं मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यातील पोलिसांनी सोमवारी सांगितलं आहे. (Crime News In Marathi)
पीडित निशा नपित (50 वर्ष) शाहपुराच्या एसडीएम होत्या. तिचा पती मनीष शर्मा (45 वर्ष) याने त्यांची हत्या केलीय. मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर पत्नी त्याला प्रतिसाद देत नव्हती, असं सांगून आरोपीने तपासकर्त्यांना चुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदनाने या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर एसडीएम निशा यांच्या खुनाचा आरोप आहे. हे जोडपं एका मॅट्रिमोनियल साइटवर भेटलं होतं. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. निशानं महिन्याभरापूर्वीच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला (Husband Killed Wife) होता. मनिषाने दिवसभर कोणतीही हालचाल केली नव्हती, म्हणून मनीष काळजीत होता. तिच्या नाकातोंडात रक्त दिसलं, त्यामुळं त्याने निशाला रविवारी दुपारी चारच्या सुमारास शाहपुरा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं होतं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा काही तासांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. मनिषने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणात वॉशिंग मशीनने एसडीएमच्या हत्येचं गूढ सोडविण्यास मदत केलीय.
निशाने शनिवारी उपवास केला होता, फक्त पेरू खाल्ले होते. त्यामुळं तिला रात्री उलट्या झाल्या आणि ती झोपली. सकाळी दहाला मनिष वॉकला गेला तेव्हाही ती झोपलेली (Crime news) होती. दुपारी २ वाजेपर्यंत ती उठली नाही, तेव्हा त्याने ड्रायव्हरच्या मदतीने तिला रूग्णालयात नेलं, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय.
वॉशिंग मशीनमुळे उलगडलं रहस्य
पोलिसांनी त्यांचं घर सील केलं आणि फॉरेन्सिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांनी घरातील प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. प्रयोगशाळेच्या चाचण्यांसाठी नमुने घेतले. पोलिसांनी जोडप्याच्या कुटुंबातील सदस्यांची आणि मित्रांची चौकशी केली. तेव्हा त्यांना शर्मा आपल्या पत्नीनंसेवा रेकॉर्ड, विमा पॉलिसी आणि बँक खात्यांमध्ये नॉमिनी न केल्यामुळं सतत तिच्याशी भांडत होता, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोस्टमार्टम अहवाल आला त्यात रविवारी पहाटे 4 च्या सुमारास निशाला उशीनं दाबून तिची हत्या केल्याचं समोर (Husband Killed Wife) आलं. आरोपीने रक्ताने माखलेली बेडशीट आणि खुनाच्या वेळी निशा आणि त्याने घातलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले होते. आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असं एसपींनी सांगितलं.
निशाची मोठी बहीण नमिता नपित हिने सांगितलं की, मनिष शर्मा बेरोजगार आहे. तो पैशासाठी सतत निशाला त्रास देत होता. जेव्हा निशाची मंडला जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा तिने त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली (MP Crime) होती. परंतु वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण मिटलं होतं. निशाने मनोजशी लग्न केल्याची माहिती नातेवाईकांना दिली नव्हती, असंही नमिताने सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.