Indore Crime  Saam Tv
क्राईम

MP crime : मामीचा भाच्यावर जडला जीव; दोघाचं प्रेम प्रकरण मामाला कळलं आणि...

Indore Crime : द्वारकापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मृताचा दगडाने ठेचून खून केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. पोलिसांनी अधिक केलेल्या तपासानुसार या व्यक्तीचा खून प्रेम प्रकरणात झाला आहे.

Bharat Jadhav

MP crime youth Killed his Uncle :

मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूर शहरामध्ये मामा भाचा यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना घडलीय. मामाची हत्या करण्यात त्याची प्रेमिका असलेल्या मामीने साथ दिली. हत्या केल्यानंतर या दोघांनी या खुनाला अपघाताचं स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर या घातपाताचं रहस्य बाहेर आलं. (Latest News)

तपासात पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलाचा जबाब आणि मोबाईल कॉल डिटेल्सवरून या खुनाचा उलगडा केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून भाचा, मामी, आणि त्यांच्या इतर दोन मित्रांना पोलिसांनी अटक केलीय. दरम्यान, रूपसिंग राठोड असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृताचा दगडाने ठेचून खून केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या (एफएसएल) पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. हा मृतदेह रूपसिंग राठोड नावाच्या व्यक्तीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन अनेकांचे जबाब नोंदवले.

सहा वर्षांच्या मुलाचा जबाब

या हत्येचा तपास करत असताना पोलिसांनी मृत रूपसिंगला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचाही जबाब घेतला. आई-वडिलांमध्ये नेहमी वाद होत होते. अनेकवेळा दोघांमध्ये हाणामारी देखील झाल्याची माहिती या मुलाने पोलिसांना दिली. लहान मुलाची जबाब ऐकल्यानंतर पोलिसांनी रूपसिंगच्या पत्नीचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली. मृताची पत्नी शुभम नावाच्या भाच्याशी खूपदा फोनवर बोलत होती ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. या कॉल डिटेल्समधून दोघांमधल्या प्रेमसंबंधांची माहिती पोलिसांना मिळाली.

पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी शुभम आणि रूपसिंगच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली.

सध्याच्या काळात प्रेमप्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. एकतर्फी प्रेमातून खून करणं, विवाहित प्रेयसीचा किंवा तिच्या पतीचा खून करणं असं या गुन्ह्यांचं स्वरूप असतं. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशात देखील घडलीय.

संशयाचं भूत शिरलं, पत्नीचं शीर धडावेगळं केलं

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका व्यक्तीने संशंयातून आपल्या पत्नीचा खून केला. नैतिक संबंधातून पतीने पत्नीची हत्या करून शीर धडावेगळं केलं आणि धडावेगळ केलेले हे शीर थेट पोलीस ठाण्याकडे निघाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला वाटेतच गाठलं आणि अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसरा गावात घडली. दोघांचेही आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि अनेक वर्षांपासून ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. त्यांना एक चार वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान अनिलला त्याच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT