Ganpat Gaikwad Video Saam TV
क्राईम

Ganpat Gaikwad Video: गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाडांचा आणखी एक व्हिडीओ VIRAL

Viral Video: सदर घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

Ganpat Gaikwad Firing Video:

भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्यात. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

आमदार गणपत गायकवाड यांचा दोन दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्थानिक महिलांनी त्यांच्यासमोर आरडाओरडा सुरू केल्याचं दिसत आहे. सदर व्हिडीओ वारली गावातील असल्याची माहिती मिळालीये. तुम्ही गरिबांना लुटणारे आमदार आहात, असं म्हणत महिलांनी संताप व्यक्त केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आली आहे. गोळीबाराच्या खळबळजनक घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष याबाबत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रात्री उशिरा झोपताय? आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतील

Virat Kohli Birthday Special: शुटिंगदरम्यान पहिली भेट, प्रेम, ब्रेकअपच्या चर्चा अन् मॅचवेळी फ्लाइंग किस; विराट- अनुष्काची हटके लव्हस्टोरी

Erandol Vidhan Sabha : निवडणूक न लढविल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज; एरंडोल मतदारसंघातून ६० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामा

Metastatic breast cancer: ब्रेस्ट कॅन्सरच्या चौथ्या टप्प्याबाबत असलेले गैरसमज, काय आहे नेमकं तथ्य?

Hyderabad Tourist Places: हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT