Uttar Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडितेच्या भावाचा हात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे

  • पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे

  • आरोपींवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील एका गावात १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कदायक म्हणजे या कट कारस्थानात तिच्या भावाचा हात असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील ग्रामीण कोतवाली भागातील एका गावात घडली आहे. पीडित मुलगी ही १३ वर्षांची असून तिच्या चुलत भावाने कारण सांगून तिला एका निर्जन स्थळी नेले. पीडितेचा भाऊ आणि पीडित मुलगी निर्जन स्थळी गेले असता तिथे त्याचे दोन मित्र आले. बराच वेळ त्यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. गप्पा झाल्यानंतर पीडितेच्या भावाने तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने नकार दर्शवल्यानंतर पीडितेच्या भावाच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर पीडितेला घटनास्थळी सोडून तिघेही फरार झाले. तिन्ही आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पीडितेला गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. शिवाय पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, तिच्या अशा परिस्थितीला तिचा भाऊ जबाबदार असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या भावासोबत त्याच्या मित्रांचाही यात हात आहे. दरम्यान पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या तिन्ही नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT