Mumbai News  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Mumbai Mira Road News : मीरारोडच्या काशीमिरा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सकाळी मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली. या हल्ल्यात २० पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Alisha Khedekar

मीरारोडच्या काशीमिरा भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तोडफोड

२० पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड करण्यात आली

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींची ओळख पटवली

मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना दिलासा दिला

मीरारोड मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या काही इसमांनी सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा वाद मुलीच्या छेडछाडीतून झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे रात्री दोन गटांमध्ये झटापट वाद झाला. या वादानंतर सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. २० पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीत कोणतीही जीवित हानी झाली नसून आर्थिक हानी झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते व त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवली. आणि त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले. तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT