Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात, इगतपुरी हिल स्टेशनपासून सुमारे ७ किमी अंतरावर त्रिंगलवाडी किल्ला वसलेला आहे.
३,००० फूट उंचीवर आणि घाटनदेवी मंदिराच्या मागे वसलेला त्रिंगलवाडी किल्ला प्राचीन 'थळ घाट' व्यापारी मार्गालगतच्या त्रिंगलवाडी या पायथ्याच्या गावाजवळ आहे.
त्रिंगलवाडी किल्ला हा पावसाळ्यातील निसर्गरम्य ट्रेक, प्राचीन काळातील खडकात कोरलेल्या १० व्या शतकातील जैन लेणी आणि एकाच अखंड खडकातून घडवलेली अद्वितीय वास्तुकला यासाठी प्रसिद्ध आहे.
त्रिंगलवाडी हा मध्ययुगीन काळातील एक डोंगरी किल्ला आहे. प्राचीन व्यापारी मार्गांवर असलेले धोरणात्मक वर्चस्व आणि यादव, मराठे व मुघल यांच्यातील वारंवार बदललेली सत्ता यांमुळे या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे पगडीच्या आकाराचे शिखर आणि सपाट माथा असलेल्या खडकाच्या रचनेवर वसलेला आहे.
त्रिंगलवाडी किल्ल्याचा ट्रेक हा सोपा ते मध्यम स्वरूपाचा असून, यासाठी दीड- दोन तास लागतात. ट्रेकिंग दरम्यान ८० अंशांच्या कोनात खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि कळसूबाई, कुलंग पर्वत रांगांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
मुंबईहून इगतपुरीसाठी ट्रेनने प्रवास करा. इगतपुरी स्थानकावरून त्रिंगलवाडी गावात जाण्यासाठी स्थानिक ऑटो-रिक्षा, शेअरिंग जीपने जा. त्यानंतर पुढे ट्रेकिंग करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.