mira bhayandar Crime News Saam tv
क्राईम

Crime News : मध्यरात्री इमारतीमध्ये घुसून अज्ञात व्यक्तीकडून रेकी; लोकांमध्ये चोरट्याची दहशत, कुठे घडतोय प्रकार?

mira bhayandar Crime News : मिरा भाईंदरमध्ये मध्यरात्री इमारतीमध्ये घुसून अज्ञात व्यक्तीकडून रेकी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे लोकांमध्ये चोरट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

मिरा-भाईंदर : भाईंदर पश्चिम परिसरात गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री इमारतीमध्ये घुसून एक अज्ञात व्यक्ती रेकी करत असल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री घराचे दरवाजे उघडे आहेत का? किंवा उघडण्यासाठी काय करावे लागेल हे पाहण्यासाठी मध्यरात्री इमारतीमध्ये जात असल्याचा चार ते पाच इमारतीमधील सीसीटीव्ही समोर आले आहेत. बुधवारी दुपारी वयोवृद्ध महिलेला घरात एकटी पाहून चोरी झाल्याची घटना देखील समोर आली आहे

भाईंदर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नाही.यावर पोलिसांची संवाद साधला असता प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.त्यामुळे पोलिसांच्या कामगिरी वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भाईंदर पश्चिमेच्या ६० फूट रोड जवळील बिंदू अपार्टमेंट, दर्शन अपार्टमेंट,नेमिनाथ बिल्डिंग इत्यादी ठिकाणी सदर इसमानी रेकी केल्याचे सीसीटीव्ही समोर आले आहेत. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी संबंधित इसमाचा तपास करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

मिरारोडमध्ये काही दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध महिलेला घरात एकटी पाहून एका चोरट्याने गंभीररित्या वृद्ध महिलेला मारहाण करत चोरी केल्याची घटना ताजी असताना भाईंदर पश्चिम मध्ये संबंधित अज्ञात इसम फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसम अमली पदार्थाचे व्यसन करत असून मध्यरात्री अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे.त्यामुळे पोलिसांना माहिती असताना देखील पोलीस का कारवाई करत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे म्हणाले, 'संबधित इसमाला चार दिवसापूर्वी संवश्यित चोर म्हणून पोलीस ठाण्यात आणले होते,मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे चोरी केलेलं साहित्य साधन मिळून आले नाही.हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे तसेच त्याला फिटचा त्रास आहे त्यामुळे सोडण्यात आले.ज्यांच्या घरी चोरी झाल्यानंतर पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार देण्यासाठी आले नाही.परंतु सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे.गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबधित व्यक्तीला अटक करण्यात येणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT