महेंद्र वानखेडे, साम प्रतिनिधी
Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमध्ये मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. आठ वर्षाच्या मुलाने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलेय. आईने दुसरे लग्न करून गेली. त्यानंतर पहिल्या पतीकडून असलेल्या ८ वर्षीय मुलाला अनाथ आश्रमात सोडले. आई भेटायला आल्यानंतर मला घेऊन चल, अशी पोराकडून केली जात होती. पण आईने पोटच्या पोराला अनाथ आश्रमातून नेलं नाही. त्यामुळे नैराश्यातून पोरानं रात्री सर्वजण झोपल्यानंतर विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उत्तन परिसरात ही घटना घडली.
मिरा भाईंदर येथील उत्तन परिसरात विहिरीत उडी मारून ८ वर्षीय चिमुकल्याने आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ७.३० सुमारास ही घटना समोर आली आहे. आईने दुसरे लग्न करून गेली आणि पहिल्या पतीकडून असलेल्या ८ वर्षीय मुलाला अनाथ आश्रमात सोडले. काही महिन्यापूर्वी आरमान अब्दुल सय्यद वय वर्षे ८ याला केअरींग हँड्स सेवा कुटीर या संस्थेत ठेवण्यात आले. मागच्या महिन्यात आई भेटायला आली असता "मला घेऊन चल आई,मला इथे नाही राहायचं" असं तो आई आणि संस्थेच्या लोकांना सांगत होता. मात्र आईने दुसरं लग्न करून नालासोपारा येथे राहत असल्याने तिने मुलाला सोबत ठेवणे नाकारले.
केयरींग हँड्स सेवा कुटीर या संस्थेत पाली उत्तन येथे असून अनाथ लहान मुलांचे संगोपन,सांभाळ करते. सर्व मुलांचा शिक्षणा पासून इतर खर्च ही संस्था करते. आई घेऊन जात नाही, म्हणून रात्री सर्व झोपी गेल्यानंतर बाजूला असलेल्या विहिरीत उडी मारून आपला जीव संपवला.या संस्थेत सध्या २१ लहान मुले राहतात,सकाळी जेव्हा सर्व उठले तेव्हा आरामान कुठे आहे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
काही वेळानंतर विहिरीत आढळून आला, संस्थेनी स्थानिक उत्तन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह भाईंदर पच्छिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले असता शवविच्छेदन अहवालात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी आरामानच्या आईला संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी मृतदेह आईकडे देण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.