Bihar Crime Saam Tv
क्राईम

Shocking News: बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना भयंकर घडलं, रक्तस्राव होऊन अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Bihar Crime: बिहारमध्ये भयंकर घटना घडली. अल्पवयीन मुला-मुलीने शारीरिक संबंध ठेवले. शरीरसंबंध ठेवल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Priya More

बॉयफ्रेंडसोबत शारीर संबंध ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिहारची राजधानी पाटणा येथे ही धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी जक्कनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करबिगहियामध्ये घडली. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रायव्हेट पार्टमधून प्रचंड रक्तस्राव होऊन या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली मुलगी जहानाबादची रहिवासी होती. या मुलीची १० दिवसांपूर्वी मसौरी येथील एका मुलाशी ओळख झाली होती. तो मुलगा देखील अल्पवयीन आहे. दोघांनी एकमेकांना मोबाइल नंबर शेअर केले होते. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. १० दिवसांत ही मुलगी या मुलाच्या प्रेमात पडली. शुक्रवारी या दोघांनी भेटण्याचा प्लान केला.

ठरल्याप्रमाणे मुलगी मुलाला भेटायला आली. सकाळी दोघे पाटणाच्या जक्कनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करबिगहिया भागात भेटले. हा मुलगा तिला घेऊन मित्राच्या घरी गेला. भेटल्यानंतर दोघांनी शरीरसंबंध ठेवले. शरीरसंबंध ठेवत असताना अचानक मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव होऊ लागला. मुलीची प्रकृती खूपच गंभीर झाली. तिची अवस्था पाहून मुलाने तिला तात्काळ एका रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या मुलीला पुढील उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला आणि त्याचा मित्राला ताब्यात घेतलं. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मृत मुलीचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मृत मुलीच्या आजोबांनी सांगितले की, मुलीने पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने शाळेत जाणं बंद केले होते. तिचे वडील सुतार काम करतात. ती सकाळी ९ वाजता आपल्या वडिलाकडे जाते असे सांगून जहानाबादला गेली. पण ती पाटणाला कशी पोहचली माहिती नाही. ज्या मुलाबद्दल सांगितले जात आहे आम्ही त्याला ओळखत नाही. रात्री ११ वाजता पोलिसांचा फोन आला तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असल्याचे कळाले. रुग्णालयात पोहचल्यावर कळाले की तिचा मृत्यू झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Accident: नाशिकच्या अपघाताची पुनरावृत्ती! माळशिरसमधील थरकाप उडवणारा अपघात घडला कसा?

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर

भेसळयुक्त दुधानंतर आता FDAच्या निशाण्यावर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने; 34.61 लाखांचा साठा जप्त

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

ठाकरेंच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या|VIDEO

SCROLL FOR NEXT