Shruti Vilas Kadam
प्रवासात मळमळ किंवा उलटीचा त्रास होत असेल तर शक्य असल्यास पुढच्या सीटवर बसा. त्यामुळे रस्त्याच्या हालचालीकडे पाहणे सोपे होते.
कारमध्ये प्रवास करताना मोबाईलवर वाचणे, व्हिडीओ पाहणे किंवा सतत स्क्रीनकडे पाहणे टाळा. यामुळे डोकेदुखी आणि मळमळ वाढू शकते.
प्रवासादरम्यान मोबाईल किंवा पुस्तकाऐवजी बाहेर दूरवरच्या स्थिर वस्तूंकडे पाहण्याचा प्रयत्न करा. डोळे आणि शरीराच्या हालचालींमधील विसंगती कमी होण्यास मदत होऊ शकते.
कार प्रवासाच्या आधी खूप तेलकट, मसालेदार किंवा जड पदार्थ खाणे टाळा. पोट पूर्णपणे रिकामे ठेवण्याऐवजी हलका आहार घेणे उपयोगी ठरू शकते.
कारमध्ये मळमळू लागल्यास खिडकी थोडी उघडून ताजी हवा घेण्याचा प्रयत्न करा. एसीचा थंड आणि ताजा प्रवाहही काही जणांना आराम देऊ शकतो.
काही लोकांना मळमळ कमी करण्यासाठी आल्याची चहा किंवा आल्याचा छोटा तुकडा किंवा आलेपाक खा. मात्र, प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम सारखा असेलच असे नाही.
लांबच्या प्रवासात सतत कारमध्ये बसण्याऐवजी मध्ये थांबून थोडे चालणे आणि ताजी हवा घेणे फायदेशीर ठरू शकते. वारंवार किंवा तीव्र त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.