Shocking : एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलींवर बलात्कार केल्यानंतर तिला ज्या ठिकाणाहून उचलून नेले होते, त्याच ठिकाणी परत सोडले. रस्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपींनी मुलीशी संवाद साधला आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. ही घटना पंजाबच्या झिरकपूर येथे घडली आहे.
पीडितेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरकपूरमधील व्हीआयपी रोडवरील मेट्रो मॉलजवळ मुलगी घरी चालत निघाली होती. तेव्हा दोन अज्ञात पुरूष आले आणि त्यांनी तिला कारमध्ये बसवले. कार चालवताना आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. ट्रिब्यून चौकाजवळच्या जंगलात आणि नंतर मोहालीच्या फेज ११ मध्ये नेले. त्यांनी तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला मेट्रो मॉलजवळ पुन्हा सोडले.
'पंचकुला येथील नादा साहिब गुरुद्वाराजवळ एका मैत्रिणीला भेटून मी घरी परतत होते. झिरकपूर मेट्रो मॉलला पोहचण्यासाठी रिक्षा घेतली होती. रिक्षामधून उतरल्यानंतर मी घराच्या दिशेने जात होते. तेव्हा एक काळ्या रंगाची कार माझ्याजवळ येऊन थांबली. एकाने मला रस्ता विचारला, तेवढ्यात दुसऱ्याने मला कारमध्ये ओढले. मी आरोपींना ओळखत नाही. त्यांनी माझ्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केला', अशी माहिती पीडितेने तिच्या आईला दिली.
मुलीचे म्हणणे ऐकल्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेच्या जबाबानंतर भारतीय न्याय संहिता कलम ६४ आणि ३ (५) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत झिरकपूर पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेतस अशी माहिती ठाण्याचे एसएचओ सतींदर सिंह यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.