Crime Killing Live Video x
क्राईम

Crime : हत्येचा Live Video! १२ सेकंदात झाडल्या ३ गोळ्या, बाईकवरुन पळताना Reel सुद्धा बनवली

Crime News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण खाली पडलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडत असल्याचे पाहायला मिळते. या थरारक व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतली आहे.

Yash Shirke

  • गोळ्या घालून तरुणाची निर्घृण हत्या

  • आरोपींनी घटना कॅमेऱ्यात केली कैद

  • सोशल मीडियावर थरारक व्हिडीओ व्हायरल

Shocking : सोशल मीडियावर एका थरारक व्हिडीओची मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात बंदूकीने जमिनीवर कोसळलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडत असल्याचे दिसते. लाईव्ह गोळीबाराचा हा भयानक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील मेरठ या ठिकाणचा असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्याची गोळ्या झाडून हत्या झाली, त्याचे नाव आदिल असे आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आदिल जमिनीवर पडलेला दिसतो. लोअर्स आणि टी-शर्ट घातलेला आरोपी आदिलवर गोळ्या झाडतो. हा व्हिडीओ आरोपीने स्वत: रेकॉर्ड केला आहे. त्याने आदिलवर एकामागून एक अशी तीन गोळ्या झाडल्या.

आदिलवर गोळीबार करत असताना आरोपी आणि त्याचे साथीदार या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात. या गंभीर प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. बेशुद्ध झाल्यानंतर आदिलवर गोळ्या झाडण्यात आल्या की त्याच्या मृतदेहावर गोळ्या झाडण्यात आल्या याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीने प्रथम आदिलचा गळा दाबून नंतर त्याच्यावर गोळीबार केल्याचा दावा केला जात आहे.

मेरठमधील लोहिया नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नरहडा गावात एका तरुणाचा मृतदेह आढळला. दुपारी त्याची ओळख २५ वर्षीय आदिल म्हणून पटली. मृतक आदिल हा लिसाडी गेट पोलिस स्टेशन परिसरातील राधना वली गली येथील रहिवासी होता. आदिलच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. आरोपींनी आदिलला जंगलात बेशुद्ध केले आणि नंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election : बापाचे झेडपीचं तिकिट कापलं, मुलाचा किळसवाणा प्रकार, अजित पवारांच्या आमदाराच्या कार्यालयाबाहेर लघवी

Premature babies care: थंडी वाढली की प्रीमॅच्युअर बाळासाठी धोका वाढतो; पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं

Marathi Actor Wedding : "रंग-ए-मेहंदी, रंग-ए-मोहब्बत"; 'ब्युटी क्वीन'च्या हातावर मराठमोळ्या अभिनेत्याच्या नावाची मेहंदी, पाहा PHOTOS

Shukra Aditya Rajyog: फेब्रुवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना अचानक धनलाभ होऊन तिजोरीत वाढणार पैसे

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

SCROLL FOR NEXT