Crime News Saam Digital
क्राईम

Crime News : गर्लफ्रेंडला हॉटेलवर नेत बॉयफ्रेंडचं भयंकर कृत्य; फोटोही स्टेटसला ठेवले, खळबळजनक घटना!

Boyfriend killed Girlfriend in hotel : दोन वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप देखील झाला होता. अशिकचे इतर काही महिलांसोबत अफेअर असल्याची माहिती फौसियाला मिळाली होती.

प्रविण वाकचौरे

Chennai News :

प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेसला ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नईच्या क्रोमपेट परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने स्टेटस पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिक (२० वर्ष) आणि फौसिया (२० वर्ष) हे दोघे सकाळी १०.३० वाजता क्रोमपेटमधील एका हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर फौसिया आणि आशिक यांच्यात जोरदार भांडण सुरु झालं. फौसियाने आशिकच्या मोबाईलमध्ये असेलल्या महिलांच्या फोटोबाबत विचारणा केली. यावरुन आशिकने फौसियाने हॉटेलमध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याच्याच टी शर्टने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅपला स्टेटस ठेवले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फौसियाच्या कॉलेजमधील ज्या मैत्रिणींकडे आशिकचा नंबर होता, त्यांना हे स्टेटस पाहून धक्काच बसला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत परिसरातील सर्व हॉटेल्स, लॉजची झडती घेतली. त्यावेळी क्रोमपेटमधील सीएलसी वर्क्स रोडवरील एका हॉटेलमध्ये फौसियाचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि आशिकला जवळल्या एका हॉटेलमधून अटक केली. (Crime News Update)

पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघे मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी या दोघांचा ब्रेकअप देखील झाला होता. अशिकचे इतर काही महिलांसोबत अफेअर असल्याची माहिती फौसियाला मिळाली होती. त्यानंतर तिने पोलिसांत याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती.

त्यावेळी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत आशिकवर कारवाई केली होती आणि त्याची रवानगी जेलमध्ये केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानी फौसियाची भेट घेत तिची माफी मागितली आणि पॅचअप देखील केलं. त्यांनी गुपचूप लग्नदेखील केले होतं, अशी माहितीही उघड समोर येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT