ola car Saam tv
क्राईम

Kalyan Crime News: '३ प्रवासी कारमध्ये बसले अन् अचानक...'; डोंबिवलीत ओला चालकासोबत घडली धक्कादायक घटना

Vishal Gangurde

अभिजित देशमुख,कल्याण

Kalyan News:

डोंबिवलीत ओला चालकाला लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील काटई नाका भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. (Latest Marathi News)

शफिक खान, अमन तौकिर, अहमद अन्सारी ,आमन शौकत जमादार अशी या चोरट्यांचे नाव आहेत. यामधील अमन जमादार, अमन अन्सारी या दोघांविरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले .

नेमकं काय घडलं?

डोंबिवली जवळील ग्रामीण भागात काटई नाका येथे सचिन शाव हा ओला कारचालक कार घेऊन जात होता. याच दरम्यान तीन प्रवासी वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसले. काही अंतरावर जाताच ओला चालकाला चाकूच्या धाक दाखवत त्याची कार , रोकड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डीसीपी सचिन गुंजाळ ,एसिपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड ,संपत फडोळ ,प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासांती यातील चोरट्यांची ओळख पटवली आहे. मानपाडा पोलिसांनी काटई नाक्यावरच सापळा रचत अटक केली.

शफिक खान ,अमन अन्सारी आणि आमन जमादार असे या तिघांची नावे आहेत. या तिघांनी याआधीही कोणाला लुटला आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. सर्व आरोपी हे डोंबिवली पूर्वेतील खोणी परिसरात असलेल्या पलावामध्ये राहणारे आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून लुटण्यात आलेली कार, रोकड आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : कुत्रे मागे लागताच चिमुकली प्रचंड घाबरली; जीवाच्या आकांताने पळाली, पण शेवटी मृत्यूने गाठलंच

Marathi News Live Updates : शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे.

हॉटस्टार किंवा Sony नव्हे, तर इथे पाहा IND vs BAN मालिका फुकटात

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

SCROLL FOR NEXT