Manoharlal Dhakad Arrested After Video on Highway Saam Tv News
क्राईम

Manoharlal Dhakad : हायवेवरील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण; मनोहरलाल धाकडला अटक, काँग्रेसकडून हायवेचं गंगाजल शिंपडून शुद्धीकरण

Manoharlal Dhakad Arrested After Video on Highway : या संपूर्ण प्रकरणात एसपी अभिषेक आनंद यांनी सांगितलं की, आज रविवारी चौकशीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Prashant Patil

मंदसौर : दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कथित भाजप नेता मनोहर लाल धाकड याला मध्य प्रदेशातील मंदसौर येथील भानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. आज रविवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं, जिथे न्यायालयाच्या आदेशानुसार धाकडला तुरुंगात पाठवण्यात आलं. या व्हिडिओनंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या हायवेवर गंगाजल शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं होतं.

या संपूर्ण प्रकरणात SP अभिषेक आनंद यांनी सांगितलं की, आज रविवारी चौकशीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंदसौर पोलिसांनी टोल कंपनीकडून त्या दिवशीच्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. ज्या एनएचआय टोल कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ लीक केला होता. त्यांची चौकशी केली जाईल आणि जर आरोप खरे आढळले तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.

काँग्रेसनं एक्सप्रेसवेवर गंगाजल शिंपडले

एक्सप्रेसवेवरील आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं एक्सप्रेसवे शुद्ध केला. शामगड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष कमलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ८व्या लेनवर जाऊन गंगाजल शिंपडून एक्सप्रेसवे शुद्ध केला आणि गायत्री मंत्राचा जप केला. तसेच अशी कृत्ये करणाऱ्यांच्या सद्बुद्धीसाठी प्रार्थना केली.

आक्षेपार्ह व्हिडिओ झाला होता व्हायरल

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर मनोहर लाल धाकड याचा त्याच्या महिला मैत्रिणीसोबतचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ १३ मेच्या रात्रीचा आहे. जेव्हा मनोहर लाल धाकड त्याच्या महिला मैत्रिणीसोबत रस्त्यावर आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते.

टोल कामगारांनी पैशाची मागणी केली होती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस वेवरील त्या ठिकाणी तैनात असलेल्या काही टोल कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ लीक न करण्याच्या बदल्यात भाजप नेत्याकडून पैसे मागितले होते. जेव्हा प्रकरण सुटले नाही तेव्हा कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ लीक केला. टोल कंपनीने त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिस त्यांचीही चौकशी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT