Rajasthan crime Saam tv
क्राईम

Rajasthan Crime : बायकोच्या चारित्र्यावर संशय; नवरा स्टेशनमध्ये असं काही घेऊन गेला, पोलीस कर्मचारीही चक्रावले

man kills wife in Rajasthan : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केली आहे. हत्येनंतर पतीने पतीचं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेने परिसरात खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

राजस्थान : राजस्थानच्या हनुमानगड जंक्शनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हनुमानगड जंक्शन परिसरातील एका व्यक्तीने रविवारी झोपेत असलेल्या स्वत:च्या पत्नीची वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तिचं कापलेलं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून तिची हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती हा पत्नीचं कापलेलं मुंडकं घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर पोलीस कर्मचारीही चक्रावले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी घरांच्या अंगणातून ३० वर्षीय एकताचं मृतदेह ताब्यात घेतला. नवऱ्याने तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केला होता. महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी रमेशला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या हत्येनंतर एकताचे वडील मोहनलाल सोनी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी रमेश मूळचा अनूपगढ जिल्ह्यातील आहे. नवी मंडी घडसाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमानगड जंक्शनच्याा वार्ड नंबर ५६ या भागात रमेश हा पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. त्याने रविवारी उशिरा पत्नीची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याला पोहोचला. त्याने पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

कोपरगावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या

अहमदनगरच्या कोपरगावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर तिघेजण फरार आहेत.

अनैतिक संबंधातच्या संशयावरून सोहेल हारून पटेल या 28 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोहेल याचे अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीनंतर उपचारादरम्यान सोहेल याचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

SCROLL FOR NEXT