bihar crime Saam Digital
क्राईम

Bihar Crime News : हुंड्यासाठी कुटूंबातील चौघांची हत्या; बायको, सासू आणि २ मुलांना संपवल्याने परिसरात खळबळ

Bihar Crime News in Marathi : बिहारच्या दरभंगाच्या मधुबनीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने बायको, २ मुले आणि सासूची हत्या केली आहे. या व्यक्तीने सासूचं डोकं झाडाला आपटून हत्या केली आहे.

Vishal Gangurde

बिहार : बिहारच्या दरभंगाच्या मधुबनीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने बायको, २ मुले आणि सासूची हत्या केली आहे. या व्यक्तीने सासूचं डोकं झाडाला आपटून हत्या केली आहे. २ मुलांनी अंथरुणात लपून स्वत:चा जीव वाचवला आहे. या प्रकारानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. य घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

बिहारमधील या व्यक्तीने चौघांची हत्या केल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. घरातील चौघांची हत्या केल्यानंतर लहान सकाळपर्यंत लपून राहिले. या घटनेची माहिती झाल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचत ४ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच २ लहान मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. तर ४ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

हुंड्यासाठी नवऱ्याचं धक्कादायक कृत्य

झंझारपूर क्षेत्रातील सुखेत गावातील ही घटना आहे. चार जणांच्या हत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मृतकांचं नावे समोर आली आहेत. पिंकी देवी, प्रमिला देवी (६०), प्रिया कुमारी (५), प्रिती (६ महिने) यांची हत्या करण्यात आली आहे. पिंकी देवीचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.

मृत महिलेचा भाऊ मिथिलेश यांनी सांगितलं की, 'बहीण पिंकीचं पवनसोबत पाच वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यानंतर तो हुंड्यासाठी छळ करू लागला. तो नेहमी मारहाण करायचा. त्यामुळे पिंकी मुलांसोबत माहेर राहत होती. तिला भेटायला पवन दारुच्या नशेत यायचा. त्या दिवशी रात्री देखील पवन हा ४-५ मित्रांसोबत आला. त्याने सासूकडे पैशांची मागणी करत मारहाण करू लागला. त्यानंतर बायकोला देखील मारहाण केली. त्याच रात्री त्याने या चौघांची हत्या केली.

झाडाखाली आढळला सासूचा मृतदेह

झंझारपूर डीएसपी पवन कुमार सिंह यांनी सांगितलं की, सासू प्रमिली देवी यांनी पळून जाऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मृतदेह एका झाडाखाली आढळला. त्याने सासूची झाडाला डोकं आपटून हत्या केली. या घटनेतून वाचलेल्या मुलांच्या जबानीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लहान मुले हत्याकांडाचे साक्षीदार आहेत. या प्रकरणातील आरोपीचा तपास सुरु आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेटचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT