CCTV Footage Saam TV
क्राईम

CCTV Footage : भररस्त्यात तरुणीला गाठलं, केस ओढून खाली पाडलं; तरुणाचं संतापजनक कृत्य

Mukherjee Nagar Man Attack on Girl : घटना घडली त्यावेळी तरुणी रस्त्यावर खाली पडली. ती खाली पडली असताना देखील त्याने तिच्यावर वार केले. मात्र यात तिला जास्त जखम झाली नाही. या घटनेवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर व्यक्तीमध्ये आल्या.

Ruchika Jadhav

Delhi Crime News :

दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्ये काळीजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात तरुणीवर चाकूने हल्ला केला आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात त्याने तरुणीवर चाकूने हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात तरुणी जास्त जखमी झाली नसून तिची प्रकृती स्थिर आहे.

सदर घटना येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याने जाताना या तरुणीवर तरुणाने अचानक हल्ला करण्यास सुरूवात केली. त्याने भाजी विक्रेत्याच्या ठेल्यावर असलेला चाकू घेतला आणि तरुणीवर हल्ला केला.

घटना घडली त्यावेळी तरुणी रस्त्यावर खाली पडली. ती खाली पडली असताना देखील त्याने तिच्यावर वार केले. मात्र यात तिला जास्त जखम झाली नाही. या घटनेवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या इतर व्यक्तीमध्ये आल्या. त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी त्या तरुणाला थांबवलं. मात्र त्याच्या हातात चाकू असल्याने तो त्यांच्या हातून निसटला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास सुरू केला आणि आरोपीला ताब्यात घेतलं. 22 मार्च रोजी ही घटना घडल्याचं समजलं आहे. पोलीस चौकशीत या तरुणाने आपण असं का केलं याबाबत माहिती सांगितली आहे. तरुण ज्या परिसरात राहतो तेथे काही मुलं त्याला पागल म्हणत चिडवतात. याच परिसरात सदर तरुणी देखील अभ्यासासाठी लायब्ररीमध्ये येते. तिने सुद्धा मला चिडवलं होतं. त्यामुळे मी रागाच्या भरात तिच्यावर हल्ला केला, असं त्याने सांगितलं आहे.

मात्र तरुणीने यावर वेगळी जबान दिली आहे. मी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला त्यामुळे त्याने माझ्यावर हल्ला केला, असं तरुणीने म्हटलं आहे. आता नेमकं खरं काय यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT