Mumbai Crime News  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: कॉमन बाथरूममध्ये जायचा, महिलांचे गुपचूप VIDEO काढायचा; मोबाइल पाहून पोलिसही हादरले

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. हा तरुण बाथरुममध्ये लघुशंकेसाठी जाणाऱ्या महिलांचे व्हिडीओ मोबाइलमध्ये शूट करत होता. या प्रकरणी तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

बाथरूममध्ये लघुशंकेसाठी जाणाऱ्या महिलांचे लपूनछपून व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या भुलेश्वरमधील एका इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. या तरुणाचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. हा मोबाइल पाहून पोलिसही चक्रावले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भुलेश्वरच्या जय हिंद इस्टेट इमारतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे भुलेश्वरमध्ये खळबळ उडाली. इमारतीच्या कॉमन बाथरूममध्ये आरोपी तरुण जायचा आणि तो लघुशंका करताना महिला आणि अल्पवयीन मुलींचे लपून व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये काढायचा. या १९ वर्षीय तरुणाला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली.

राजनकुमार चौपाल असं आरोपी तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुळचा बिहारच्या मधुबनमध्ये राहणारा आहे. अटकेनंतर पोलिसांनी या तरुणाचा मोबाइल ताब्यात घेतला. त्याचा मोबाइल पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला कारण त्याच्या मोबाइलमध्ये ८ व्हिडीओ सापडले. त्याने काही महिला आणि अल्पवयीन मुलींचे लघुशंका करताचे व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केले होते.

पोलिसांना आरोपीच्या मोबाइलमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ सापडले. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनकुमारला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७ सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि अटकेची कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai : मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ बसणार? पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती टक्के पाणीसाठा उरलाय? माहिती समोर

Rasam Rice Recipe: घरच्या घरी टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल रसम राईस नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

SCROLL FOR NEXT