Sakshi Sunil Jadhav
बदलापूर हे ठिकाण फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर आहे.
१८५६ साली हे स्थानक तयार करण्यात आले.
शिवकालात मराठे सैनिक त्यांचे घोडे या ठिकाणी बदलायचे.
शिवकालापासून मग या शहराला बदलापूर हे नाव देण्यात आले.
पेशवेकाळातले कागदपत्र पाहता त्यामध्ये बदलापूर उर्फ चोण असा उल्लेख आहे.
तसेच या ठिकाणाला कुळगाव बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते.
बदलापूर शहरात काही ऐतिहासिक मंदिरे आणि खुणा पाहायला मिळतात.
शिवाय साष्टीच्या बखरीमध्ये वसई मोहिमेच्या वेळेस चिमाजीअप्पा हे बदलापुरात मुक्कामाला आले होते.
इतकेच नाही तप इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेस इंग्राचे सैन्य अधिकारी येथे मुक्काम करून राहिले होते.