MP Crime Saam tv
क्राईम

MP Crime:धक्कादायक! ३ आदिवासी मुलींवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

MP Crime 3 Tribal Girl Physically Assaulting: बालाघाटमध्ये एक संतापजनक घटना घडलीय. येथील तीन आदिवाशी मुलींवर सामूहिक अत्याचार घडल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलीय.

Bharat Jadhav

बालाघाटमध्ये संतापजनक घटना घडलीय. येथील ३ आदिवासी मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. या तीन अल्पवयीन मुलींवर किमान ७ पुरूषांनी बलात्कार केल्याची बाब समोर आलीय. मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय.

नुकत्याच उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधित सर्व सात आरोपींना बालाघाट पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय दंड संहिता (IPC), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करून जलद कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याची पुष्टी केली आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

शिवपुरीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

तीन महिन्यांपूर्वी शिवपुरीच्या मायापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. हे संतापजनक घटना मुलीने गर्भपात केल्यानंतर उघडकीस आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे. नराधमांनी पीडितेला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची गितौरा गावातील रहिवासी जितेंद्र चंदेल आणि विवेक यादव यांच्याशी मैत्री झाली होती. दोन्ही तरुण तिच्याशी फोनवर बोलत असत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी आरोपीने तिला बोलण्याच्या बहाण्याने बालवाडीत बोलावले. त्यांनी तिला नशायुक्त पदार्थ दिले आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी केलेल्या कृत्याचा उजागर करून असं म्हणताच आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. जर तिने याची माहिती कोणाला दिली तर तिला मारून फेकून देऊ. या भीतीमुळे तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT