A 30-year-old woman was physically assaulted in a running train Saam TV
क्राईम

Crime News: संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये ३० वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं, आरोपी अटकेत

Satish Daud

Women Rape in Running Train

धावत्या ट्रेनमध्ये एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उत्तरप्रदेशच्या जबलपूर शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला डब्यातून बाहेर फेकलं. त्यानंतर स्वत:ला ट्रेनच्या रिकाम्या एसी डब्यात कोंडून घेतलं. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमलेश कुशवाह (वय २२ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तैनात पोलीस दलासाठी स्पेशल ट्रेन चालवण्यात आली होती.

पोलिसांना (Police) सोडून रविवारी रात्री ही ट्रेन रिकामी परतत होती. यावेळी ट्रेनमध्ये कुणीच नव्हतं. पीडित महिलेला उचाहर येथे जायचं असल्याने ती या ट्रेनमध्ये चढली. दरम्यान, आरोपी कमलेश हा ट्रेनमध्ये आधीपासूनच हजर होता. त्याने महिलेला टॉयलेटमध्ये जाताना बघितलं.

टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर आरोपीने कमलेशने पीडितेला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याने पीडितेवर तीन वेळा बलात्कार (Crime News) देखील केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडितेला ट्रेनमधून ढकलून दिलं. अंगावर अर्धवट कपडे असतानाही पीडिता जखमी अवस्थेत जवळच्या पोलीस स्थानकात पोहचली.

महिलेवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच सतना पोलिसांनी तातडीने रेल्वे पोलिसांसोबत संपर्क साधत आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आरोपीने ट्रेनच्या डब्यात स्वत:ला कोंडून घेतलं होतं. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT