Madhya Pradesh Gwalior Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : दोन रिक्षाचालकाचं हादरवणारं कृत्य; २० वर्षीय तरुणीला निर्जनस्थळी नेऊन केला सामूहिक बलात्कार

Madhya Pradesh Gwalior Crime News : मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये २० वर्षीय तरुणीचे ई-रिक्षातून अपहरण करून तिघांकडून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • ग्वालियरमध्ये २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

  • रिक्षा चालकांसह तिघांनी निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले

  • पोलिसांत तक्रार दाखल

  • तिन्ही आरोपींना अटक

Madhya Pradesh Gwalior 20 years old Girl Gang Rape मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या पीडित तरुणीचं रिक्षा चालवणाऱ्या तीन तरुणांनी आधी अपहरण केलं आणि त्यानंतर तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील डाबरा देहात येथे घडली आहे. गुरुवारी पीडित तरुणी आपल्या मावशीकडे गेली असता रात्री १० वाजताच्या सुमारास टिक्की खाण्यास बाहेर पडली. ती जात असताना, ई-रिक्षा चालवणाऱ्या दोन तरुणांनी तिला थांबवले. तिचं तोंड जबरदस्तीने बांधून तिला रिक्षामध्ये बसण्यास भाग पाडलं.

त्यानंतर वाटेत २ आरोपींनी त्यांच्या एका मित्राला रिक्षात घेतले आणि रिक्षा अरु तिरहा जवळील एका कॉलेज कॅम्पसमध्ये थांबवली. या कॅम्पसमध्ये तिघांनी मिळून २० वर्षीय तरुणीवर एकापाठोपाठ एक आळीपाळीने लैंगिक शोषण केले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तरुणीला शुक्रवारी सकाळी तिच्या मावशीच्या घराखाली नेवून सोडले.

पीडितेने घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिन्ही तरुणांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT