Madhya Pradesh Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : डोळे बंद करा, ५१ पर्यंत आकडे मोजा, देवीचं दर्शन मिळेल; डोळे उघडताच महिलेच्या पायाखालची जमीन सरकली

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. नायब तहसीलदाराच्या पत्नीला देवीच्या दर्शनाच्या बहाण्याने सुटाबुटातील चोरट्यांनी दागिने लुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • सतना जिल्ह्यात नायब तहसीलदाराच्या पत्नीला चोरट्यांनी लुटलं.

  • देवीच्या दर्शनाचा बहाणा करून दागिने हिसकावले गेले.

  • चोरट्यांनी महिलेला डोळे बंद करून ५१ पर्यंत आकडे मोजायला सांगितले.

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन सुटाबुटातील तरुणांनी देवीच्या दर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने महिलेच्या अंगावरचे दागिने चोरी केले. धक्कदायक म्हणजे ही महिला नायब तहसीलदाराची बायको असल्याचे समोर आले आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील पीडितेचे नाव विनिता मांझी असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सतना जिल्ह्यातील नागौड शहरातील एसडीएम बंगल्यासमोर सिव्हिल लाईन्स परिसरात दोन तरुण दुचाकीवरून आले. हे दोन्ही तरुण अगदी सुटाबुटात होते. या दोघांनी नायब तहसीलदार राजेंद्र मांझी यांच्या पत्नी विनिता मांझी यांना वाटेत अडवले. शिवाय नवरात्रीत त्यांना देवीच्या दर्शनाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्यांचे कानातले, नाकाची अंगठी आणि मंगळसूत्र हिसकावून घेतले.

यानंतर या लुटारूंनी विनिता मांझी यांना डोळे बंद करून ५१ आकडे मोजण्यास सांगितले. विनिता मांझी यांनी डोळे बंद करून ५१ आकडे मोजण्यास सुरु केले. या दरम्यान चोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. आजूबाजूला चोरटे दिसले नाहीत म्हणून विनिता यांनी आजूबाजूला शोधाशोध केली मात्र चोरटे लांब लांब पर्यंत त्यांना दिसले नाहीत.

घाबरलेल्या विनिता यांनी आपली फसवणूक झाली असल्याचे समजताच तडक पोलीस ठाणे गाठले. घडलेली आपबिती त्यांनी पोलिसांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच , पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि विनीताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुगाव्यांद्वारे आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : साहिबजादा फरहानचा माज उतरला; विकेट पडताच संतापला...पाहा व्हिडिओ

Akola Flood: दु:ख कोणाला सांगयचं! बैलजोडीसह गाडी पुरात बुडाली; शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत 'नंदी राजा'चा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार; जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर|VIDEO

IND Vs Pak : पाकिस्तानच्या कॅप्टनला सूर्याने पुन्हा केलं इग्नोर, रवी शास्त्रींनीही बोलणं टाळलं; VIDEO

Jalgaon Politics : माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर भलतेच उद्योग; पोलिसांकडून मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT