Student Assault Case saam tv
क्राईम

Crime News: ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, गुंगीचं औषधं देऊन केला बलात्कार; विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

Student Assault Case: लखनऊच्या तेजस रुग्णालयातील धक्कादायक प्रकरणात एका विद्यार्थिनीने डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

लखनऊच्या तेजस रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रूग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे खळबळ उडालीये. पीडितेने रुग्णालयाचे डॉक्टर विजय कुमार गिरी यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या बक्षी तलाव भागातील तेजस रुग्णालयात एका १९ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिला फीट्स येण्याचा त्रास होत होता. तीन दिवसांपूर्वी त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. विजय गिरी यांनी ट्यूब टाकण्याचा सल्ला दिला आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. पीडितेची बहीण तिच्यासोबत होती पण तिला परत बाहेर पाठवण्यात आलं.

ऑपरेशन थिएटरमध्ये केला बलात्कार

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला एक इंजेक्शन देण्यात आलं ज्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध झाली. त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. तिची प्रकृती अधिकच खालावली होती. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल सांगितलं ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा आरडाओरडा केला.

पोलिसांकडून डॉक्टरला अटक

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं. आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस पुढील कारवाईची तयारी करत आहेत.

या प्रकरणी उत्तरचे एडीसीपी टिंकल जैन यांनी सांगितलं की, तेजस रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर ऑपरेशन थिएटरमध्ये एका डॉक्टरने बलात्कार केल्याची माहिती बीकेटी पोलीस ठाण्याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला जातोय. आरोपी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : पायाचं हाड तुटलं, पण डॉक्टरांनी ऑपरेशन केलं हृदयाचं; दुसऱ्या दिवशी महिलेने गमावला जीव

Jalgaon Crime News: सहा महिन्यात ४४३ जणांनी संपवलं आयुष्य; लग्न जुळत नसल्याने २९ तरुणांनी उचललं टोकाचं पाऊल

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; School बसमध्ये CCTV, लोकेशन सक्तीचे

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

गावरान स्टाईल पातूरची रानभाजी; भाकरीसोबत लागेल एकदम भन्नाट

SCROLL FOR NEXT