Crime News Saam TV
क्राईम

Crime News : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह पोटच्या मुलांची हत्या; तीन दिवस मृतदेहांसोबत राहिला अन्...

Lucknow Crime News : राम आणि ज्योती यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली होती. मात्र राम ज्योतीवर सतत संशय घ्यायचा. ती फोनवर बोलत असताना राम आल्यावर घाबरायची आणि फोन कट करायाची. त्यामुळे रामचा संशय आणखी वाढत होता.

Ruchika Jadhav

Lucknow :

लखनऊमधून तिहेरी हत्याकांडाची एक विचित्र घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर नराधमाने आपल्या पोटच्या दोन मुलांना देखील संपवले आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजनौर परिसरातील सरवण नगर भागात ही घटना २८ मार्च रोजी घडली. राम असं आरोपी पतीचं नाव आहे. तर पत्नी ज्योती (३०) पायल (6) आणि आनंद (3) अशी मृत आई आणि मुलांची नावे आहेत. नराधमाने या तिघांची हत्या केल्यावर तो तीन रात्र मृतदेहांसोबतच तिथे राहिला.

राम आणि ज्योती यांच्या लग्नाला ७ वर्षे झाली होती. मात्र राम ज्योतीवर सतत संशय घ्यायचा. ती फोनवर बोलत असताना राम आल्यावर घाबरायची आणि फोन कट करायाची. त्यामुळे रामचा संशय आणखी वाढत होता, असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.

२८ मार्च रोजी देखील या कारणावरून त्या दोघांमध्ये चोरदार भांडणे झाली. त्यानंतर रामने आपल्या दोन लहान मुलांसमोरच आपल्या पत्नीची हत्या केली. त्याने ओढणीने पत्नीचा गळा आवळला आणि तिला संपवलं. मुलांनी हे सर्व पाहिल्याने ते पोलिसांना सर्व खरं सांगतील आणि आपण अडचणीत येऊ हे समजताच त्याने आपल्या मुलांची देखील हत्या केली.

३ दिवस त्याने मृतदेह घरातच ठेवले. कुटुंबातील सर्वजण होळीमुळे गावी गेले आहेत, असं त्याने शेजारच्या नागरिकांना सांगितलं. मात्र तो काही वेळासाठी बाहेर गेला तेव्हा शेजारच्या व्यक्तीला त्याच्या घरातून वास येऊ लागला. त्याने दरवाजा उघडून पाहिले तेव्हा घरामध्ये तीन मृतहेद पडले होते. त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पतीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात धुवाधार पावसामुळे सीना नदीला पूर

Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; २५ वर्षीय अभिनेत्रीवर सिनेमात काम देण्याचं आमिष देऊन ३ वर्ष अत्याचार केल्याचा आरोप

Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार

Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

SCROLL FOR NEXT