लखनऊच्या इंदिरानगरमध्ये २८ वर्षीय मॉडेलची आत्महत्या
पतीकडून झालेल्या अपमानामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज
कुटुंबीयांकडून अद्याप लेखी तक्रार दाखल नाही
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील इंदिरानगर पोलिस स्टेशन परिसरात, २८ वर्षीय मॉडेलने गळफास घेत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे नवऱ्याने माकड म्हणून हिणवल्याने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मृत तन्नू सिंग हिच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीवर आरोप केले असले तरी कोणतीही लेखी तक्रार पोलीस ठाण्यात केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तन्नू सिंगला मॉडेलिंगची आवड होती. ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय होती. शिवाय तन्नू सिंग तिचा पती राहुल सिंगसोबत इंदिरानगर सेक्टर १४ मध्ये राहत होती. बुधवारी संध्याकाळी सिंग कुटुंब सीतापूर येथील एका नातेवाईकाच्या घरून परतले होते. घरी आल्यानंतर, सर्वजण बसून गप्पा मारत होते .
यादरम्यान, तनुचा पती राहुलने तिला मस्करीत 'माकड' म्हटले, ज्यामुळे तिला राग आला आणि ती दुसऱ्या खोलीत निघून गेली. त्यानंतर राहुल जेवण आणण्यासाठी बाहेर गेला. थोड्या वेळाने तो परत आला तेव्हा त्याने तन्नूची बहीण अंजलीला तन्नूला बोलवायला सांगितले. अंजली खोलीत गेली तेव्हा दरवाजा आतून बंद होता.
बराच वेळ हाक मारूनही आतमधून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. खिडकीतून डोकावताना तन्नू लटकलेली दिसली. ते पाहून अंजली मोठ्याने ओरडली. गोंधळ ऐकून राहुल आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. दरवाजा तोडला आणि तन्नूला फासावरून खाली उतरवण्यात आले. तिला तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुटुंबाने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही आत्महत्या कौटुंबिक वाद किंवा विनोदातून झाल्याचे दिसून येते. कुटुंबाकडून अद्याप कोणतीही लेखी तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार आल्यास त्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.