क्राईम

Dhule Crime : धुळ्यातील कॅफेमध्ये चालायचा अश्लील प्रकार; जोडप्यासह कॅफे चालक पोलिसांच्या ताब्यात

Dhule Crime : धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या जी टी पी नगर परिसरातल्या दीप कॉम्प्लेक्समधील युनिक कॅफेमध्ये हा अश्लील प्रकार सुरू होता.कॅफेमध्ये अश्लील प्रकार केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(भूषण अहिरे)

Local Crime Investigation Department Dhule :

धुळ्यात एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय.कॅफेंमध्ये महाविद्यालयीन तरुण- तरुणींचे अश्लिल कृत्य चालत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक असा प्रकार समोर आला होता. आता धुळ्यातही कफेतील अश्लील कृत्य केल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय.या कॅफेवर धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापेमारी केली.

या ठिकाणाहून तीन जोडप्यांना अश्लील चाळे करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असलेल्या जी टी पी नगर परिसरातल्या दीप कॉम्प्लेक्समधील युनिक कॅफेमध्ये हा अश्लील प्रकार सुरू होता.कॅफेमध्ये अश्लील प्रकार केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित कॅफेवर छापेमारी केली. येथे ३ जोडपे अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या तिघाही जोडप्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना या संदर्भातील माहिती देत कॅफे चालकावर गुन्हा दाखल केलाय. कॅफे चालक ४०० रुपये घेऊन जोडप्याना अश्लील चाळे करण्यासाठी कॅफेचा वापर करू देत होता. दरम्यान कॅफेवरील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चहा- कॉफीच्या नावाखाली भलताच खेळ

नाशिकमध्येही असाच प्रकार समोर आला होता. कॅफेमध्ये चालू असणारा प्रकार समोर आल्यानंतर नाशिक पालिका आणि पोलिसांनी शहरातील ९ कॅफे सील केले होते. महाविद्यालयांच्या आसपास असलेले हे कॉफी शॉप म्हणजे प्रेमीयुगूल अन् तरुण- तरुणींसाठी रोमान्स पॉईंट ठरत आहेत.नाशिक महानगरपालिका आणि नाशिक पोलिसांनी आज संयुक्त मोहीम राबून कॉलेजरोड परिसरातील कॅफेवर न धडक कारवाई केली. होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

SCROLL FOR NEXT