lcb arrests mahila balvikas project officer for accepting bribe in dhule saam tv
क्राईम

Dhule Crime: महिला अधिका-याने कर्मचाऱ्यांकडून घेतली 54 हजार रुपयांची लाच, धुळ्यात एसीबीने पकडले रंगेहाथ

Dhule Latest Marathi News : कर्मचा-यांचा प्रवासभत्ता काढुन दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडुन 10 टक्के प्रमाणे एकुण 93 हजार रुपयांची मागणी महिला अधिकारी यांनी केली हाेती.

भूषण अहिरे

धुळे जिल्ह्यात महिला बालकल्याण प्रकल्प महिला अधिकारी यांना प्रवास भत्त्याचे बिल मंजुर करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून 54 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने अटक केली. या घटनेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येथे खळबळ उडाली. (Maharashtra News)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संबंधित महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांच्या विराेधात तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहनिशा झाल्यानंतर एसीबीने सापळला रचला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सापळ्यात शुभांगी बनसोडे या अलगद सापडल्या. बनसाेडे यांना कर्मचाऱ्यांकडून 54 हजार रुपयांची लाच घेणं चांगलेच महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला अधिकारी यांना अटक केली.

अशी हाेती तक्रार

बनसाेडे यांनी तक्रारादार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावुन घेवुन प्रवास भत्ता मंजुर झालेल्या कर्मचा-यांचा प्रवासभत्ता काढुन दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडुन 10 टक्के प्रमाणे एकुण 93 हजार रुपयांची मागणी केली. पैसे जमा करुन आणुन देण्यास सांगुन पैसे दिले नाही तर पुढील प्रवासभत्त्याची बिले काढुन देणार नाही असेही सांगितले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT