Kolkata Crime  Saam Tv
क्राईम

Crime: संतापजनक! लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; माजी विद्यार्थ्यासह २ कर्मचाऱ्यांचं भयंकर कृत्य

कोलकातामध्ये लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एक जण माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेनं अख्खा देश संतापला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच कोलकातात एका लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींमध्ये कॉलेजमधील माजी विद्यार्थी आणि दोन कर्मचारी आहेत. या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी संध्याकाळी साडेसात पासून रात्री १०.५० पर्यंत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी तिने खूप विनवण्या केल्या; मात्र, त्यांनी वासनांध आरोपींनी तिच्यावर अगणित अत्याचार केले. पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध सुरू केला. २६ जून रोजी आरोपींना अटक करण्यात आली. तर या घटनेत सामील असलेल्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी २६ आणि २७ जूनच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अटक केली.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडील मोबाइल जप्त केले आहेत. तिघांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींच्या कुटुंबीयांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं आहे. त्यांच्याकडे घटनेबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

पोलीस सूत्रांनुसार, घटनेनंतर पीडित विद्यार्थिनी पोलीस ठाण्यात गेली. सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार तिने दाखल केली. कॉलेजचे दोन कर्मचारी आणि एका माजी विद्यार्थ्याने कृत्य केल्याचे तिने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले. पीडितेच्या तक्रारीनंतर नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये तिची वैद्यकीय तपासणी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये एक माजी विद्यार्थी देखील आहे. त्याने २०२२ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला कॉलेजच्या एका रुममध्ये बोलावून घेतले. तिथे तिच्यावर अत्याचार केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT