Kudal News Saam Tv
क्राईम

Crime News : जंगलात नेलं, गळा दाबला, प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणीची हत्या; कुडाळमध्ये आरोपीला बेड्या

Kudal News : कुडाळ तालुक्यातील घावनळे येथे १७ वर्षीय दीक्षा बागवे हत्येचा उलगडा झाला आहे. दोन महिन्यांनंतर आरोपी कुणाल कुंभारला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Alisha Khedekar

  • कुडाळ तालुक्यातील घावनळे येथे १७ वर्षीय दीक्षा बागवेची हत्या.

  • दोन महिन्यांच्या तपासानंतर आरोपी कुणाल कुंभार अटकेत.

  • दीक्षाचा मृतदेह गावातील जंगलात नको त्या अवस्थेत सापडला होता.

  • प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा अंदाज आहे.

कुडाळ मधून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. कुडाळच्या घावनळेमध्ये एका तरुण मुलीची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा उलगडा करून तब्बल दोन महिन्यांनी तरुणीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कदायक म्हणजे गावातील जंगलात नेऊन हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायगंणवाडी) मधून १७ वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. दोन ऑगस्टला दीक्षा काॅलेजला जायला निघाली, मात्र ती घरी परतलीच नाही. दीक्षा घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. शोधाशोध करूनही दीक्षा न सापडल्याने बागवे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दीक्षा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

दीक्षाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी दीक्षाला शोधण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली. काही दिवसांनी पोलिसांना दीक्षाचा मृतदेह गावातील एका जंगलात नको त्या अवस्थेत सापडला. परंतु तिच्या हत्येमागचं कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल दोन महिन्यांनी दीक्षाच्या हत्येमागचं कारण समोर आलं आहे. तसेच संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचं नाव कुणाल कृष्णा कुंभार आहे. आरोपीला कुडाळ तालुका न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

माणगाव खोऱ्यातील गोठोस गावातील जंगलातील एका मांगरात नेऊन गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून कुणालने केल्याची कबूली दिली आहे. आरोपी कुणाल कुंभारकडून अजून काय काय माहिती येते यावर या हत्येची व्याप्ती अवलंबून असणार आहे. शिवाय प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी या नराधमाला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : भाषणादरम्यान कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पंकजा मुंडे भडकल्या

Nifad News : अतिवृष्टीने द्राक्ष बागांचे नुकसान; शेतकरी आक्रमक, वनिता नदीत उतरून आंदोलन

Maratha Aarakshan : सरकारने आरक्षण दिलेय, पण खुर्चीसाठी काही..., मुंडेंचा जरांगेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Ratangad Fort History: सह्याद्रीच्या कुशीत वसलेला रतनगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि वैशिष्ट्ये

Face Care: दररोज फेस पावडर लावण्याची सवय आहे, मग चेहऱ्याला होऊ शकतात 'हे' स्किन प्रॉब्लेम्स

SCROLL FOR NEXT