मुंबई : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ३१ वर्षीय पीजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पीडितेच्या शरीरावर १४ हून अधिक जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामध्ये तिचे डोके, चेहरा, मान, हात आणि गुप्तांगांचा समावेश आहे. यावरून पीडितेवर झालेल्या हल्ल्याची भीषणता स्पष्ट (Kolkata Doctor Case) होतेय.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट
शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय. पीडितेच्या शरीरावर लैंगिक छळाच्या स्पष्ट खुणा होत्या. पोस्टमार्टममध्ये बलात्काराचे ठोस पुरावे मिळाले (Kolkata News) आहेत. शवविच्छेदन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की, पीडितेच्या शरीरावर नोंदवलेल्या जखमांमध्ये नाक, उजवा जबडा, डावा हात आणि खांद्यावरील गंभीर जखमांचा समावेश आहे. पोस्टमॉर्टममध्ये फुफ्फुसात रक्तस्त्राव आणि रक्ताच्या गाठी असल्याचंही आढळून आलंय. त्यामुळे शरीराला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट होतंय.
हल्ल्याची भीषणता
रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलंय की, ज्या साक्षीदारांनी हा मृतदेह पहिल्यांदा पाहिला. त्यांनी तो सेमिनार हॉलमधील एका व्यासपीठावर पडला होता असं सांगितलं. पीडित तरूणीचं शरीर मानेपासून गुडघ्यापर्यंत निळ्या चादरीने झाकलं (Kolkata doctor News) होतं. तिचा कुर्ता अस्ताव्यस्त पडला होता, तर पँट गायब होती. मृतदेहाशेजारी लॅपटॉप, एक वही, मोबाईल आणि पाण्याची बाटली पडलेली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्धी झोपेत असताना देखील पीडितेने तिच्या सर्व शक्तीनिशी हल्ल्याचा प्रतिकार केला होता.
मृत्यूचं कारण समोर
मृत तरूणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आरोपीच्या हातावर खोल जखम आणि ओरखडे पडल्याचे अधिकारी म्हणाले आहेत. वैद्यकीय तपासणीदरम्यान आरोपीच्या शरीरावरील हे ओरखडे पीडितेच्या नखांमधून घेतलेल्या त्वचेच्या आणि रक्ताच्या नमुन्यांशी जुळणारे आढळले (Kolkata News) आहेत. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण गळा दाबून असल्याचं नमूद करण्यात आलंय. अहवालात पीडितेच्या चेहऱ्यावर ओरखडे आणि जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत, त्या डोळ्यांपासून मानेपर्यंत आहेत. हल्ल्याच्या वेळी पीडित तरूणी गाढ झोपेत होती, याचाच आरोपींना फायदा झाल्याचं देखील अहवालात नमूद करण्यात आलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.