Kolhapur Online Gaming Saam Tv
क्राईम

Kolhapur Crime : ऑनलाईन रम्मी खेळून कर्जबाजारी, चोरी करताना वृद्ध महिलेची हत्या; मृतदेह गोबरगॅसच्या प्लांटमध्ये टाकला

Kolhapur Online Gaming : कोल्हापूरमध्ये ऑनलाईन रम्मीच्या नादात दोन मित्रांनी चोरीच्या प्रयत्नात ७३ वर्षीय महिलेची हत्या केली. तिचा मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकला. पोलिसांनी आरोपींना अटक करून थरारक गुन्ह्याचा छडा लावला.

Alisha Khedekar

  • ऑनलाईन रम्मीच्या नादात दोन मित्र झाले कर्जबाजारी

  • चोरीच्या प्रयत्नात वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकला

  • कोल्हापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना अटक केली

  • गेमिंगच्या व्यसनाने तरुणांचा भवितव्य उद्ध्वस्त, गाव हादरले

ऑनलाईन गेमिंगवर बंदी असूनही अनेकजण या ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गावर जातात. अशीच एक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. ऑनलाईन रमी खेळून कर्जबाजारी झालेल्या दोन मित्रांनी चोरीचा कट रचला. एका घरात चोरी करत असताना या दोन मित्रांना घरात असलेल्या वृद्ध महिलेने नकार दिल्याने त्यांनी तिचा काटा काढला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह गोबरगॅसमध्ये टाकून पळ काढला. मात्र त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पणोरे गावात मारुती पाटील आणि कपिल पातळे ही दोघं बालपणापासूनचे मित्र आहेत. या दोघांनाही ऑनलाईन रम्मीचे वेड होते. या वेडापायी ऑनलाइन रम्मीत पैशाची उधळण केल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे दोघांवर लाखो रुपयांचं कर्ज झालं. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी या मित्रांनी गावातीलच ७३ वर्षीय श्रीमंती रेवडेकर या महिलेचं दागिने चोरण्याचा कट रचला.

चोरी करण्यासाठी त्यांनी अंतचतुर्दशीचा मुहूर्त ठरवला. या दिवशी महिलेच्या घरी कोणीही नसल्याचा सुगावा लागल्याने या दोघांनी संधी साधली आणि महिलेच्या घरी शिरकाव केला. यावेळेस महिला एकटी घरी होती. तिच्या अंगावरील दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला. परंतु रेवडेकर यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह गोबर गॅस मध्ये टाकून दागिने घेवून त्यांनी पलायन केलं.

या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आणि राधानगरी पोलीसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपीनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली. त्यानंतर पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या खूनाची कबुली दिलीये.

या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आणि राधानगरी पोलीसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपीनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली. त्यानंतर पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या हत्येची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

SCROLL FOR NEXT