Kolhapur Crime Saam Tv
क्राईम

Crime: कोल्हापुरात पहाटे रक्तरंजित थरार! दारुसाठी पैसे दिले नाही, तरुणाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

Kolhapur Crime: कोल्हापुरात हत्याकांडाची भयंकर घटना घडली. दारूसाठी पैसे दिले नाही त्यामुळे संतापलेल्या तरुणाने आईची हत्या केली. डोक्यामध्ये वरवंटा टाकत आरोपीने आईला जागीच संपवलं. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Priya More

रणजित माझगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरमध्ये तरुणाने आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला. त्यामुळे झालेल्या वादातून संतप्त झालेल्या तरुणाने आईच्या डोक्यात वरवंटा टाकत तिची हत्या केली. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दारूसाठी पैसे देत नाही म्हणून तरुणाने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. कोल्हापुरातील साळुंखे पार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३ वर्षे) असं मृत महिलेचे नाव आहे. विजय निकम असं आरोपीचे नाव आहे. सावित्रीबाई यांच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. आज पहाटे त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. सावित्रीबाईंनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

वाद सुरू असताना संतप्त झालेल्या सावित्रीबाई यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सावित्रीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या हत्येनंतर आरोपी तिथेच बसून होता. आईची हत्या करूनही तरुणाच्या चेहऱ्यावर पश्चाताप झाल्याचे दिसत नव्हते. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

आरोपीविरोधात आईच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सावित्रीबाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्या झालेल्या ठिकाणाची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी आणि पंचनामा सुरू आहे. या घटनेमुळे साळुंखे पार्कमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Medication: झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या मेंदूसोबत नेमकं काय घडतं? वाचून तुमची झोपच उडेल!

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

Korlai Fort History: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

Maharashtra Live News Update: नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची कुंभमेळामंत्री गिरीश महाजन करणार पाहणी

Accident News : मुंबईहून पुण्याला जाताना तरुणाचा भीषण अपघात; घाटात तोल गेला, १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT