Kolhapur Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : कोल्हापूर हादरले! दागिन्यांसाठी नातवाने आजीला संपवलं, चहातून विष दिलं नंतर...

Kolhapur Crime News : कोल्हापुरात दागिन्यांच्या लालसेपोटी नातवाने आजीला चहातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचे दागिने जप्त केले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू अखेर खून असल्याचे स्पष्ट

  • दागिन्यांच्या लालसेपोटी नातवाने विष देऊन हत्या

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून दागिने जप्त केले

  • तांत्रिक तपास आणि चौकशीत आरोपीची धक्कादायक कबुली

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर परिसरात घडलेल्या वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला अखेर खुनाचे स्वरूप मिळाले आहे. उषा मारुती भिऊंगडे, वय ७२, यांचा त्यांच्या चुलत नातवानेच दागिन्यांच्या लालसेपोटी चहातून विष देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी प्रेम परशुराम भिऊंगडे, वय २०, याला अटक केली असून चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर तालीम शेजारील फ्लॅटमध्ये उषा भिऊंगडे या एकट्याच राहत होत्या. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. रविवारी रात्री त्यांना औषध देण्यासाठी नातेवाईक फ्लॅटवर गेले होते. मात्र सोमवारी सकाळी फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना संपर्क साधण्यात आला.

शेजाऱ्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता त्या निपचित अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू ठेवला.

मृत महिलेचे काही दागिने गायब असल्याचे समजताच चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय बळावला. तांत्रिक तपासादरम्यान सोमवारी सकाळी प्रेम भिऊंगडे फ्लॅटमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि सहायक निरीक्षक सागर वाघ यांनी कसून चौकशी केली असता प्रेमने गुन्ह्याची कबुली दिली. दागिन्यांसाठी आजीला चहातून विष दिल्याचे त्याने मान्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Kanya Pujan 2026 : कन्या पूजनासाठी मुलींचं वय किती असावं? २ ते १० वर्षांच्या कन्यांच्या पूजेचं धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Maharashtra News Live Update: ठाण्यात उन्नत मार्गाचा लोखंडी सांगाडा कोसळला

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेचा दिग्गज नेता फोडला, ५ नगरसेवक अन् २०० पदाधिकाऱ्यांसह हाती घेतलं कमळ

Skin Glow Drink : फक्त ७ दिवसांत ब्रायडल ग्लो हवाय? 'हे' सोपे अन् जादुई ड्रिंक पिऊन तर पाहा

SCROLL FOR NEXT