Kirti Vyas Case  
क्राईम

Kirti Vyas Case: मृतदेह मिळाला नाही, फक्त एका पुराव्यामुळं कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं

Bharat Jadhav

कीर्ती व्यास हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिलाय. या प्रकरणात कीर्ती व्यासच्या दोन्ही सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. या हत्या प्रकरणात पोलिसांनी कीर्ती व्यासचा मृतदेह अजून सापडलेला नाहीये. नेमका काय आहे हे प्रकरण याची माहिती जाणून घेऊ.

काय आहे हे प्रकरण

आरोपी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी यांच्यासोबत कीर्ती व्यास हिचा वाद झाला होता. कीर्ती व्यास ही एका सलूनमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. त्याच सलूनमध्ये सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी काम करत होते. सिद्धेश आणि खुशी हे दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. कीर्तीने सिद्धेशला कामात दुरुस्तीसाठी नोटीस दिली होती, त्याचा राग मनात धरून त्याने कीर्तीचा खून केला होता.

सिद्धेश आणि कीर्तीचा वाद झाला तेव्हा जीएसटी नव्याने आला होता. जीएसटीविषयी जाणून घेण्यास सिद्धेश इच्छुक नव्हता. याच कारणामुळे कीर्तीने सिद्धेशला नोटीस दिली होती, त्याच वादावरुन कीर्तीचा खून झाला. दरम्यान सिद्धेशला नोकरी गमावण्याची भीती होती, त्यामुळे तो कीर्तीला नोटीस मागे घेण्यास सांगत होता. १६ मार्च रोजी सिद्धेश ताम्हाणकर आणि खुशी सजलानीने कीर्तीला तिच्या घरुन बोलवून कारमध्ये बसवलं. त्यावेळी सिद्धेशने कीर्तीला नोटीस मागे घेण्याचा दबाव टाकला. परंतु जेव्हा कीर्तीने त्यासाठी नकार दिला तेव्हा सिद्धेशने तिचा गळा आवळला. त्यानंतर मृतदेहला कारच्या मागच्या बाजूला खाली टाकलं.

यानंतर सिद्धेश गाडीतून खाली उतरून परळ येथील घरी आणि तेथून ऑफिसला गेला. खुशी सजलानीने मृतदेह असलेले वाहन सांताक्रूझ येथील तिच्या इमारतीत नेले. तेथे कार पार्क केल्यानंतर ती अंधेरीतील कार्यालयात गेली. सायंकाळी पाच वाजता दोन्ही आरोपी काही मिनिटांच्या अंतराने कार्यालयातून बाहेर पडले. खुशीने तिच्या इमारतीमधून कार काढली आणि नंतर सिद्धेशला उचलून चेंबूरजवळील मेहुल गावातील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकून दिला.

सहा वर्षांपूर्वी व्यास यांच्या हत्येचे खळबळजनक प्रकरण समोर आले होतं. पोलिसांना या हत्येप्रकरणात कीर्ती व्यासचा मृतदेह अजून मिळून आलेला नाहीये. परंतु गुन्हे शाखेने डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्याच्या आधारे खटला तयार केला. न्यायालयाने ते पुरावे पुरेसे मानत या हत्याकांडाचा गुन्हा सिद्ध केला. दरम्यान हा हत्याकांड १६ मार्च २०१८ रोजी झाला होता. तर आरोपींना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तीन महिन्यांनी गुन्हे प्रकरणी चार्जशीट करण्यात आली. या गुन्हेचा तपास मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीर, गु्न्हे शाखेचे प्रमुख संजय सक्सेना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एम. प्रसन्ना यांच्या नेतृत्त्वात केला गेला.

या प्रकरणातील पहिला पुरावा खुशी सजलानीची फोर्ड इकोस्पोर्ट कारमधून मिळाला. मुंबईच्या गुन्हे शाखेने फॉरेंसिक लॅबमध्ये कार पाठवलं, त्यावेळी कारमध्ये रक्ताचे डाग दिसून आले. या रक्ताच नमुना कीर्तीच्या आई-वडिलांच्या रक्तांशी जुळवण्यात आला. त्यानंतर त्यांचा डीएनए जुळून आला. त्यावरुन कीर्ती ही कारमध्ये असल्याचं निष्पन्न झालं.

त्यानंतर डीसीपी दिलीप सावंत, ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजे, निरीक्षक सचिन माने, हृदय मिश्रा, प्रमोद शिर्के आणि सोनावणे, यांनी खुशी सजलानी आणि सिद्धेश ताम्हाणकर यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही तपासलेत. घटनेच्या रात्री कीर्ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी खुशी आणि सिद्धेश हे इतर बी ब्लंट सलूनच्या सर्व कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात गेले.पण क्राईम ब्रँचने कीर्तीच्या घरापासून तिच्या ऑफिसपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले. आपला गुन्हा उघडकीस येण्याच्या भीतीने खुशीने पोलिसांना सांगितले की, १६ मार्च रोजी सकाळी कीर्ती आमच्यासोबत कारमध्ये होती.

परंतु आम्ही तिला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर सोडले होतं. कीर्ती ट्रेनने अंधेरी येथील ऑफिसला जात होती. मग पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण कीर्ती त्यात दिसली नाही. त्यानंतर गुन्हे शाखेने खुशीची कार फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना रक्ताचे डाग दिसून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

SCROLL FOR NEXT