Legal twist in Kharadi rave party case: No criminal record found against Dr. Pranjal Khewalkar saam tv
क्राईम

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Pune Police Make False Claim In Rave Case: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय. पुणे पोलिसांनी डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हेगारी आरोप असल्याचा दावा केला, परंतु त्यांच्या वकिलांनी कोणताही एफआयआर दाखल केला नसल्याचे उघड केले.

Bharat Jadhav

  • खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं स्पष्ट झालं.

  • पोलिसांनी न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा खुलासा वकिलांनी केला.

  • या घटनेमुळे पोलिस तपासाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

  • या प्रकरणाची फेरचौकशी होण्याची शक्यता असून, पोलिसांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आलीय. रेव्ह पार्टीचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून मोठी चूक झाल्याची बाब उघडकीस आलीय. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं पोलिासांनी न्यायालयात म्हटलं होतं. मात्र त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचा दावा वकिलांनी केलाय.

खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावई डॉ.प्रांजल खेवलकर यांना अटक झालीय. खेवलकर रेव्ह पार्टीत साडल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी बनाव करून डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी केलाय.

पोलिसांनी आधी हॉटेलची रेकी केली होती त्यानंतर प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा कट रचण्यात आला असा आरोप खेवलकर यांच्या वकिलांनी केलाय. दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले. इशा सिंग हिच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडलं होतं.

इशा सिंगला प्लांट करण्यात आले होतं,असं प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी सांगितलंय. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आले आहे. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचं सांगितले होते.

मात्र त्यांच्यावर एकही गुन्ह्यांची नोंद नाही ही बाब वकिलांनी पोलीस आयुक्तांना दाखवून दिलीय. रिमांड कॉपीमध्ये आरोपी क्रमांक एकवर प्रांजल खेवलकर आणि आरोपी क्रमांक पाचवर श्रीपाद यादव यांचे नाव घेण्यात आले आहे. या दोघांवर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. मात्र आरोपी क्रमांक दोन निखिल पोपटानी आणि आरोपी क्रमांक पाच श्रीपाद यादव यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. टायपिंग करताना चूक झाल्याचं पोलिसांनी मान्य केलंय. मात्र पोलिसांच्या टायपिंगच्या चुकीमुळे आमच्या अशिलाची बदनामी झाल्याच वकिलांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT