khamgoan police arrests three in fighting case  Saam Digital
क्राईम

Buldhana Crime: खामगावमधील हॉटेल चालकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

Firing Incident Near Khamgoan Bus Stand : या हत्येनंतर समाज माध्यमात बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची जाेरदार चर्चा सुरु आहे.

संजय जाधव

खामगाव शहरात बस स्टँड परिसरात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हॉटेल चालकाची हत्या करण्यात आली. हा हत्येचा थरारक व्हिडिओ सध्या समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे. एका क्लब मध्ये जिंकलेल्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

खामगाव आणि शेगाव परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांचा परिणाम काल रात्री पुन्हा एकदा खामगावकरांना अनुभवायला मिळाला आहे. खामगाव बस स्थानक समोर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी चार जणांनी हॉटेल व्यवसायिक प्रकाश सोनी यांची चाकूने भोसकून हत्या केली.

या घटनेबाबत मिळालेल्या माहिती अशी - सोनी यांनी परिसरात एका क्लब मध्ये मोठी रक्कम जिंकली होती. त्यातूनच हा वाद उद्भवला. त्यानंतर प्रकाश सोनी यांची नागरिकांच्या समोर चौघांनी चाकूने भोसकून हत्या केल्याचा थरार खामगाव बस स्थानकासमोर रात्री घडला.

या हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तत्काळ यातील तिघांना अटक केली. एका मारेक-याचा शाेध सुरु आहे. दरम्यान खामगाव, शेगाव परिसरात सुरू असलेले क्लब व अवैध व्यवसायामुळे पुन्हा एकदा नागरिकांना हत्येचा थरार बघायला मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

Yavatmal : बँकेतून काढलेले १ लाख रुपये लांबविले; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

SCROLL FOR NEXT