CRIME NEWS Saam Tv
क्राईम

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

man kills mother : दारुला पैसे न दिल्याने मुलाने आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली.

Vishal Gangurde

बागलकोटमधील तुलसीगेरी गावात मुलाने दारूसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या केलीये

मुलाने आईचे हात-पाय बांधून, तोंडात बोळा कोंबून गळा दाबून केली हत्या

दुसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास आल्याने शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना कळवलं.

कर्नाटकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईला संपवण्याची घटना घडली आहे. बागलकोटच्या तुलसीगेरी गावात घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शवक्का गिरीसागर असे हत्या झालेल्या माहिलेचं नाव आहे. तर २८ वर्षीय वेंगटेश गिरीसागर असे आरोपी मुलाचे नाव आहे. शवक्का यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यांची एका मुलीचं लग्न झालं. दोघे मायलेक गावात भाड्याच्या घरात राहत होते.

दारुच्या व्यसनात बुडालेला वेंकटेश दररोज आईकडे पैसे मागयाचा. आईने दारुसाठी पैसे न दिल्याने भांडण देखील करायचा. गुरुवारी रात्री देखील दोघांमध्ये भांडण झालं.

त्या रात्री काय घडलं?

वेंकटेश दारुच्या नशेत आईकडून पैसे मागू लागला. मात्र, आईने नकार दिला. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने वेंकटेश चिडला. त्याने आईचे हात-पाय बांधले. त्यानंतर तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. पुढे या नराधम मुलाने गळा दाबून आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर घरातून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास आजूबाजूच्या घरात पसरला. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील दृश्य पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

कलादगी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी गाव आणि आसपासच्या परिसरात नाकाबंदी लावली होती. काही तासांनी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी एका बारमध्ये दारू पीत बसला होता. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिक पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी...

Veen Doghatli Hi Tutena : नव्या आव्हानांची सप्तपदी! लग्नानंतर कसा सुरू होणार समर-स्वानंदीच्या प्रेमाचा प्रवास? पाहा VIDEO

YAMAHA Bike Launch: स्पोर्टी लूक, जबरदस्त इंजिनसह ४ बाईक लाँच; किंमत किती? वाचा

Winter Health Care : हिवाळ्यात किती अंडी खाल्ली पाहिजेत ? जाणून घ्या फायदे

Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा' बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

SCROLL FOR NEXT