Karnataka Crime News Saam tv
क्राईम

Karnataka Crime News : सोबत फिरायला आली नाही; बहिणीच्या समोरच तरुणीला नराधमानं क्रूरपणे संपवलं

Karnataka Crime News: कर्नाटकातील हुबळी येथे धक्कादायक आणि तितकीच चीड आणणारी घटना घडली आहे. सोबत फिरायला जाण्यास नकार दिला म्हणून चिडलेल्या तरुणानं २१ वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या केली.

Manasvi Choudhary

कर्नाटकातील (Karnataka) हुबळी येथे धक्कादायक आणि तितकीच चीड आणणारी घटना घडली आहे. सोबत फिरायला जाण्यास नकार दिला म्हणून चिडलेल्या तरुणानं २१ वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या केली. काहीच दिवसांपूर्वी कॉलेजच्या आवारातच नेहा हिरेमठ नावाच्या तरुणीची तिच्या वर्गातील तरुणानं क्रूरपणे हत्या केली होती. या घटनांवरून कर्नाटकात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंजली असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. २३ वर्षीय विश्व उर्फ गिरीश सावंत यानं घरात घुसून अंजलीवर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. अंजलीची हत्या तिच्या बहिणीच्या डोळ्यांदेखतच झाली.

अंजली ही तिच्या बहिणी आणि आजीसोबत राहायची. गिरीश बुधवारी त्यांच्या घरात घुसला. त्यानं अंजलीवर धारदार शस्त्रानं सपासप वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी अंजलीची बहीण समोरच होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गिरीशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फरार गिरीशच्या शोधासाठी पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गिरीशनं अंजलीला धमकावल्याची तक्रार तिच्या आजीने पोलिसांत केली होती. गिरीशने अलीकडेच अंजलीला पुन्हा धमकी दिली होती. म्हैसूरला सोबत फिरायला जाऊ असं गिरीश तिला म्हणाला होता. अंजलीनं त्याला नकार दिला. त्यावर तुझी अवस्था नेहा हिरेमठसारखी करीन अशी धमकीच दिली होती, अशी माहिती अंजलीच्या बहिणीनं दिली.

गिरीश माझ्या बहिणीला बऱ्याच दिवसांपासून धमकावत होता. माझ्या बहिणीने त्याला नकार दिला होता. म्हैसूरला फिरण्यासाठी जाऊ या असं त्यानं सांगितलं होतं. त्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. नेहा हिरेमठसारखी अवस्था करीन, अशा धमक्याही तिला द्यायचा, असंही तिनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या बहिणीला धमकावत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती, पण ती गांभीर्यानं घेतली नाही आणि आज माझ्या बहिणीची हत्या झाली, असा आरोपही तिने केला. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. या घटनेनंतर अंजलीचे कुटुंबीय आणि स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

Constipation: सकाळी पोट साफ होत नाही? मग रात्रीच्या खाण्यात करा हा बदल; 1 मिनिटांत पोट होईल साफ

SCROLL FOR NEXT