Karnataka Crime : ६ वर्षांच्या पोटच्या पोरासाठी आईच बनली काळ; नवऱ्यासोबत भांडणानंतर मगरीच्या कळपात फेकलं

Wife Through Child In Canal: नवरा बायकोच्या भांडणात ६ वर्षाच्या मुलाचा मृ्त्यू झालाय. ही धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
Husband Wife Dispute
Husband Wife DisputeYandex

नवऱ्यासोबत झालेल्या वादातून एका महिलेने आपल्या ६ वर्षाच्या मुलाला मगरी असलेल्या कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये (Karnataka Crime News) घडली आहे. या घटनेनंतर मुलाचा शोध घेण्यासाठी तैनात असलेल्या शोध पथकाने मगरीच्या जबड्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे. त्याच्या मृतदेहाचा काही भाग मगरीने खाल्ल्याचं आढळलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून महिला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना कर्नाटकमधील दांडेली तालुक्यातील हलमाडी गावात घडली आहे. या प्रकरणी सावित्री नावाची महिला आणि तिचा नवरा रवी कुमार यांना अटक करण्यात (Wife Through Child In Canal) आलीय. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव विनोद आहे. ६ वर्षांच्या विनोदला व्यवस्थित बोलता आणि ऐकू येत नव्हते. यावरून सावित्री आणि रवीमध्ये नेहमी भांडण होत होतं.

शनिवारी देखील सावित्री आणि रवी यांच्यात मुलावरून वाद झाला होता. यानंतर रागाच्या भरात सावित्रीने आपल्या ६ वर्षांच्या मुलाला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कालव्यात फेकून दिलं. घटनेनंतर काही वेळातच पोलीस तिथे (Husband Wife Dispute) पोहोचले. अग्निशमन दलाच्या गोताखोरांनी या कालव्यात शोधमोहीम सुरू केली होती.

दुसऱ्या दिवशी रविवारी शोध पथकाने मगरीच्या जबड्यातून ६ वर्षीय विनोदचा मृतदेह बाहेर काढला आहे. मगरींनी त्याच्या उजव्या हाताचा काही भाग खाल्ल्याचं निदर्शनास आलं आहे. शरीरावर गंभीर जखमा आणि मगरीच्या चाव्याच्या खुणा आहेत. आरोपी दाम्पत्य गवंडी आणि मोलकरीण म्हणून काम करत होते. या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात (Crocodile Canal) आली आहे.

Husband Wife Dispute
Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

या संपूर्ण घटनेला नवरा जबाबदार असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. नवरा वारंवार म्हणायचा की मुलगा फक्त खात आहे, त्याला मरू द्या, असं त्या महिलेनं पोलिसांना सांगितल्याची माहिती आज तकच्या वृत्तानुसार मिळत आहे.

Husband Wife Dispute
Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com