Mysuru murder shocker — Lover stuffs explosives in girlfriend’s mouth, leaving face shattered. saamtv
क्राईम

Shocking: प्रियकराची सटकली, प्रेयसीच्या तोंडात कोंबली स्फोटकं; स्फोटानंतर चेहरा झाला छिन्नविछन्न

Karnataka Crime Lover Turns Killer: म्हैसूरच्या हंसूर तालुक्यात एक धक्कादायक हत्याकांड घडलाय. वाद झाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात स्फोटकांचा स्फोट करत तिची निर्घृणपणे हत्या केली.

Bharat Jadhav

  • म्हैसूर जिल्ह्यात प्रियकराने प्रेयसीची क्रूरपणे हत्या केली.

  • वादानंतर मुलीच्या तोंडात स्फोटकं कोंबल्याने तिचा चेहरा उद्ध्वस्त झाला.

  • मृत मुलगी रक्षिता ही विवाहित असून आरोपी सिद्धाराजूशी अवैध संबंध होते.

कर्नाटकातील म्हैसरू जिल्ह्यात भयानक घटना घडलीय. एका वीस मुलाचा राक्षसी चेहरा समोर आलाय. एका मुलानं त्याच्या प्रेयसीची क्रूरपणे हत्या केलीय. हत्येची घटना जिल्ह्यातील हंसूर तालुक्यातील गेरसानहल्ली गावात घडलीय. पोलिसांना मुलीचा मृतदेह लॉन्जमध्ये आढळून आला होता. मुलीचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछन्न झाला होता. रुममध्ये रक्ताचा सडा पडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे नाव सिद्धाराजू आहे. तो आणि त्याची प्रेयसी लॉजमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता, त्यातून त्याने तिची क्रूरपणे हत्या केली. खून झालेल्या मुलीचं नाव रक्षिता असे आहे. रक्षिताचं लग्न केरळमधील एका कामगाराशी झाले होते. पण तिचं सिद्धराजूशी अवैध संबंध होते. सिद्धराजू हा तिच्या नातेवईक आहे.

पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी ते दोघे लॉजमध्ये गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर सिद्धराजू याला संताप आला, त्या रागाच्या भरात त्याने प्रेयसीच्या तोंडात स्फोटकं कोंबली त्यानंतर खाणींमध्ये जिलेटिनच्या काड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरचा वापर करून त्याचा स्फोट केला. या स्फोटामुळे रक्षिताचा चेहऱ्याच्या चिंधड्या उडल्या होत्या. संपूर्ण रुममध्ये रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांना या घटनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी प्रकरणाचा तपास लगेच सुरू केला.

तपासात पोलिसांना प्रियकर सिद्धराजू याचे नाव समोर आले. सुरुवातीला त्याने पोलिसांना खोटी माहिती देत त्यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रेयसीची मृत्यू मोबाईलच्या स्फोटामुळे झाल्याची मागिती त्याने पोलिसांना दिली होती. स्थानिकांनी सिद्धराजू याला पकडलं होतं. त्यांनी पोलिसांना याची महिती दिली, त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS धर्मांतरण प्रकरणी एमआयएमच्या नेत्याला पोलिसांची नोटिस|VIDEO

Famous Singers Accident : ३ प्रसिद्ध गायकांचा भीषण अपघात, कुणाच्या पायाला फ्रॅक्चर तर कुणाच्या छातीला दुखापत; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्गावर मासळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात

Crime : डॉक्टरकीला काळीमा! ऑपरेशन थिअटरमध्येच बारावीच्या मुलीवर बलात्कार, मेडिकल क्षेत्रात खळबळ

Petrol Diesel Price Hike : मुंबईकरांवर आर्थिक संकट! पेट्रोल ₹१०८, डिझेल ₹९५; ऑटो-टॅक्सीचा प्रवासही महागणार

SCROLL FOR NEXT