Kalyan News : Saam tv
क्राईम

Kalyan News : रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; मुंबई-हावडा मेलमधून 1100000 रुपयांच्या अंमली पदार्थाची तस्करी, एकाला अटक

Kalyan News update : कल्याण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई केलीये. पोलिसांनी तब्बल ११ लाख रुपयांची अंमली पदार्थाची तस्करी पकडली.

Vishal Gangurde

कल्याण येथे रेल्वे पोलिसांनी हावडा एक्स्प्रेसमधून गांजा तस्करी

हावडा एक्स्प्रेसमधून ५७ किलो गांजा जप्त

तस्करी करणारा मोहम्मद इरफान पोलिसांच्या ताब्यात

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : रेल्वे संरक्षण दलाच्या गुप्तचेर शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मुंबई-हावडा मेलमधून साडे अकरा लाखांचा ५७ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी कारवाई करत गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गांजा तस्कर मोहम्मद इरफानला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला मुंबई नार्कोटिक्सच्या ताब्यात दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण आरपीएफच्या गुन्हे गुप्तचर शाखेने मोठी कारवाई करत हावडा मेल एक्स्प्रेसमधून सुमारे साडे ११ लाख रुपये किमतीचा 57 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजा तस्कर मोहम्मद इरफान याला बेड्या ठोकल्यात. हावडा एक्स्प्रेसमध्ये गांजाचा साठा असल्याची माहिती आरपीएफच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरपीएफच्या पथकाने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हावडा एक्स्प्रेसमध्ये गस्त सुरू केली.

मोहम्मदवर संशय आल्याने त्यांनी त्यांच्या बॅगेची झडती घेतली, त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मोहम्मद ट्रॉलीबॅगमधून गांजा घेऊन दादरला जाणार होता. आरपीएफने मोहम्मदला मुंबई नार्कोटिक्स विभागाच्या ताब्यात दिले आहे. त्याने हा गांजा कुठून आणला? कुणाला विकणार होता याचा तपास पोलीस करत आहेत.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुण्यातील चंदननगर परिसरात काही महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला. या छापेमारीत पोलिसांनी काही प्रमाणात गांजा जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तिन्ही महिलांकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गांजाची विक्री करत असल्याची कबुली दिली. या महिलांकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड आणि १.९५ किलो गांजा जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी अतिवृष्टीने हैरान अन् आमदार संजय बनसोडे दांडियाच्या कार्यक्रमात सहकुटुंब व्यस्त

Walking Mistakes: वॉकिंग करताना कधीही 'या' ५ चुका करू नका, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान

Smita Shewale: तीन वेळा मला ही भूमिका...; प्रसिद्ध अभिनेत्रीला साकारायचंय 'हे' खास पात्र, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

Tuesday Horoscope : भाग्याची दारे उघडणार, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Lawrence Bishnoi Gang : कुख्यात लॉरेन्सचा खेळ खल्लास? बिष्णोई गँग दहशतवादी म्हणून घोषित; कुणी केला घोषणा?

SCROLL FOR NEXT