Kalyan Crime Branch Saam Tv
क्राईम

Kalyan Crime News: चाकूचा धाक दाखवून Google Pay मधून उकळले १२हजार रुपये; क्राईम ब्रँचने गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख )

Thieves Robbed Rickshaw Driver:

चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण क्राईम ब्रँचने ही कारवाई केलीय. सनी तूसांबड, असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कल्याण क्राईम ब्रँचने डोंबिवली पश्चिमेकडील ५२ चाळ परिसरातून त्याला अटक केली असून पोलीस त्याचा साथीदार अक्षय अहिरेचा शोध घेत आहे. (Latest News)

सनी तूसांबड आणि त्याचा साथीदार अक्षय अहिरे यांनी रिक्षाने घरी जाणाऱ्या रणजित शंकर गलांडे यांची लुटमार केली होती. गलांडे यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेने सापळा रचत या गुन्हेगाराला अटक केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित शंकर गलांडे हे डोंबिवली पूर्वेकडील बंदिश चौकातील कालीकामाता चाळीत राहतात. मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास रणजित गलांडे हे शेलार नाक्यावरून रिक्षाने घरी जात होते. त्यावेळी सनी तुसांबड आणि त्याचा साथीदार अक्षय अहिरे या दोघांनी रणजित यांच्या पोटाला चाकू लावला. जीवे मारण्याची धमकी देत या लुटारूंनी त्यांना मारहाण केली.

त्यानंतर त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर या दुकलीने चाकूचा धाक दाखवून रणजित यांच्या मोबाईलमधील गुगल-पेचा युपीआय आयडी पिन नंबर घेतला. त्यातून आरडाओरडा केल्यास ठार मारू, अशी धमकी देत लुटारूंनी रणजित यांच्या गुगल-पेमधून १२ हजार १०० रूपये काढून घेतले. पैसे काढल्यानंतर या चोरट्यांनी तेथून पळ काढला.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गलांडे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. याचदरम्यान क्राईम ब्रँच कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस कर्मचारी विश्वास माने आणि गुरूनाथ जरग यांना सनी तुसांबड हा पश्चिम डोंबिवलीतील ५२ चाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडवर येणार असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, संजय माळी, कर्मचारी विश्वास माने,बापुराव जाधव, गुरूनाथ जरग यांच्या पथकाने सापळा रचत सनी तुसांबड याला अटक केली. दरम्यान त्याचा साथीदार अक्षय अहिरे हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सनी तुसांबड आणि अक्षय अहिरे हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT