Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: टेप का बंद केला , कुणी तक्रार केली..नाव सांगा , तरुणांचा कपडे काढून पोलीस स्थानकातच धिंगाणा

Kalyan Crime News: डोंबिवलीत रस्त्यावर कारमध्ये मोठ्या आवाजात टेप लावून डान्स करत धिंगाणा घालणाऱ्याना टिळक नगर पोलिसांनी थांबविले ,समज दिली . मात्र संतापलेल्या तरुणांनी थेट टिळक नगर पोलीस ठाणे गाठले . कारटेप बंद का केला ,कुणी तक्रार केली ,आम्हाला नाव सांगा , याचा जाब विचारत पोलीस ठाण्यातच कपडे काढून धिंगाणा घातला .

Sandeep Gawade

Kalyan Crime News

डोंबिवलीत रस्त्यावर कारमध्ये मोठ्या आवाजात टेप लावून डान्स करत धिंगाणा घालणाऱ्याना टिळक नगर पोलिसांनी थांबविले ,समज दिली . मात्र संतापलेल्या तरुणांनी थेट टिळक नगर पोलीस ठाणे गाठले . कारटेप बंद का केला ,कुणी तक्रार केली ,आम्हाला नाव सांगा , याचा जाब विचारत पोलीस ठाण्यातच कपडे काढून धिंगाणा घातला . सुरुवातीला या तरुणांची समजूत काढणाऱ्या पोलिसांनी अखेर पोलीस खाक्या दाखवत या तरुणांना अटक केली.

डोंबिवली टिळनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर कार लावून काही तरुण डान्स करत धिंगाणा घालत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याठिकाणी बीट मार्शल पोहचले. त्यांनी कारमधील मोठ्या आवाजातील टेप बंद केला. या तरुणांना समज देत पोलीस तिथून निघून गेले . घडलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणांनी थेट पोलीस ठाणे गाठले. आमचा कार टेप का बंद केला तक्रार कोणी केली त्याचं नाव सांगा असं विचारत पोलीस ठाण्यात धिंगाणा घालण्यात सुरुवात केली. अंगावरील कपडे काढून ते महिला पोलिसासमोरच धिंगाणा घालू लागले. या तरुणांना आवारताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुवातीला पोलिसांनी समजवले मात्र तरुण ऐकत नसल्याने अखेर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला . या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करीत या सहा तरुणांना अटक केली . पोलिसांनी विलास भुंजग, राजू भुजंग, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. यामधील विलास भुजंग याच्या विरोधात यापूर्वी पोलीस ठाण्यात पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

Vaibhav Taneja Tesla : एलोन मस्क यांच्या अमेरिका पार्टी'मध्ये मोठी जबाबदारी पार पाडणारे वैभव तनेजा नेमके कोण?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

SCROLL FOR NEXT