Kolsewadi Police Saam tv
क्राईम

Kalyan Crime: पुण्याच्या घटनेची कल्याणमध्ये पुनरावृत्ती; एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या बहिणीला भररस्त्यात मारहाण

Kalyan News ; संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: एकतर्फी प्रेमातून कल्याणमध्ये भयंकर प्रकार घडला आहे. भर रस्त्यात तरुणीला अडवून तुझ्या (Kalyan) बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग; असे धमकावुन मारहाण केली. इतकेच नाही तर तिचा मोबाईल (Crime News) हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. या तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हेमंत गमरे असे या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेत भररस्त्यात हा प्रकार घडला आहे. हेमंत गमरे याचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातून त्याने तरुणीच्या बहिणीचा पाठलाग करत जवळ पोहचत रास्ता अडविला. यानंतर तुझ्या बहिणीवर (Love Afair) प्रेम करतो. ती माझ्याशी बोलत नाही. तिला सांग माझ्याशी लग्न करायला अशी धमकी दिली. हे ऐकून ही तरुणी घाबरली व ती पुढे चालू लागली. संतापलेल्या या तरुणाने त्या तरुणीला पकडून तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग अशी धमकी देत भर रस्त्यात मारहाण केली व  त्या तरुणीचा मोबाईल हिसकावून तो तरुण पळून गेला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेची माहिती तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली. पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पेालिस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलिस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रुप पालटणार, १४ कोटींचा विकास आराखडा तयार

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! ११००० पेक्षा जास्त रिक्त पदे; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Balumama Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, बाळूमामांचे मंदिर ३ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय?

Panchang Today: आज शुक्ल नवमी, रोहिणी नक्षत्र प्रभावी; वृषभ राशीत चंद्रामुळे चार राशींना मिळणार पैसा

Rashmika-Vijay Wedding : विजय देवरकोंडाच्या आईने सुनबाईंसाठी घातल्या ३ अटी, रश्मिका मंदाना पूर्ण करणार का? लग्नाआधी VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT