Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: धक्कादायक! पत्नीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकला, भयानक कृत्यानंतर पतीने स्वत: दिली सासऱ्याला माहिती

Kalyan Crime News: रिक्षा घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Sandeep Gawade

Kalyan Crime News

रिक्षा घेण्यासाठी पत्नी माहेरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून पतीने फावड्याच्या दांड्याने मारहाण करत गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण, टिटवाळा परिसरात ही घटना घडली असून निर्दयीपणाचा कळस म्हणजे हत्येनंतर पत्नीचा मृतदेह एका ड्रममध्ये भरून ड्रम जंगलात फेकून दिला होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी मैनुद्दीन अन्सारी याला बेड्या ठोकल्यात आहेत. अलीमुन अन्सारी असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणजवळ टिटवाळा मांडा परिसरात मैनुद्दीन अन्सारी पत्नी अलीमुन व 10 वर्षाच्या मुलासह राहात होता. मैनुद्दीनला रिक्षा घ्यायची असल्याने तो अलीमुनकडे माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावत होता. यावरून मेनुद्दीन व अलीमुनमध्ये वरचेवर वाद होत असत.दरम्यान त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शाळेत गेला असताना पुन्हा या दोघांमध्ये वाद झाले. यावेळी संतापलेल्या मैनुद्दीनने फावड्याच्या दांड्याने पत्नी अलीमुनला मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून हत्या केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह एका ड्रममध्ये भरला आणि हा ड्रम टिटवाळा जवळच्या जंगलात फेकून दिला. केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसलेल्या मैनुद्दीन त्यानंतर याची माहिती तिच्या वडिलांना दिली आणि तुम्ही पण पोलीस स्टेशनला या असे सांगितले. माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि मैनुद्दीन बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav : मोठी बातमी! अविनाश जाधव यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, दंडही ठोठावला

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

World Widest Tunnel: मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट, जगातील सर्वात रुंद बोगदा आतून कसा आहे? पाहा VIDEO

Hair Steam Therapy : तुम्हालाही केस मजबूत हवे आहेत? मग दरोरोज केसांना घरच्या घरी द्या स्टीम थेरेपी

Gulachi Poli Recipe: गूळ न विरघळता परफेक्ट गुळाची पोळी कशी बनवायची? पाहा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT