Kalyan Crime News  
क्राईम

Crime : टिटवाळ्यात नात्याला काळिमा, रेल्वे अधिकाऱ्याचा प्रताप, पोटच्या मुलीवर ६ वर्ष लैंगिक अत्याचार

kalyan Crime News : टिटवळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. रेल्वेत मोठ्या पदावर काम करणाऱ्या नराधमाने पोटच्या मुलीवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

Namdeo Kumbhar

अभिजित देशमुख

Kalyan Crime News : कल्याण जवळील टिटवाळा परिसरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर सहा वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधमाने याने त्याचे पत्नी व मुलीला जीव ठार मारण्याचे धमकी दिली होती, त्यामुळे पीडिता निमूटपणे अत्याचार सहन करत होती. सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पीडितेने याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार टिटवाळा पोलिसांनी या नराधम बापाला बेडा ठोकल्यात. हा नराधम रेल्वेत उच्च पदावर कार्यरत असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे . या प्रकरणी टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत .

सदर पीडित मुलगी अनेक वर्षांपासून टिटवाळा परिसरात राहते. पिडीतेच्या नराधम बापाने तिच्यावर सोळा वर्षाची असल्यापासून लैंगिक अत्याचार केला. तो तिला मारहाण करत होता, याबाबत कुठे वाच्यता केली तर पत्नीला व तुला जिवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे ही पीडिता निमुटपणे त्याचा अत्याचार सहन करत होती.

अखेर एका समाजसेविकेच्या मदतीने हा प्रकार उघडकीस आला. समाजसेविकेने पिडितेला घेऊन टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार टिटवाळा पोलिसांनी नराधम बापा विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात. या प्रकारानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी होत आहे. बापाच्या रूपातच जेव्हा नराधम घरात असतो, तेव्हा अशा मुलींची सुटका कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

SCROLL FOR NEXT