कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या.
आरोपी पती विशाल भुतकर याच्यावर खुनाचा आरोप.
पती-पत्नी गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत होते.
संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी
कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर याने हा खून केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे वेगवेगळे राहत होते.
विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील कैलास कारभारी यांच्या चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन करत होती.
दरम्यान ११ मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र अर्चनाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर हल्ला करून जमिनीवर डोक आपटून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन मी माझ्या बायकोला मारून आलो आहे, अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली.
या प्रकरणी मयताचा मामेभाऊ राजू सुभाष ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला, असून पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे. यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.