Kalyan Crime Saam Tv
क्राईम

Kalyan Crime : दाल-वड्याला उशीर, कल्याणमध्ये भाईचा इगो हर्ट! लंकेने हॉटेल मालकाला बेदम मारलं अन्...

Kalyan News : कल्याणमध्ये गुंडाने दारूच्या नशेत हॉटेलमालकावर हल्ला केला. थोडा वेळ थांबा असे सांगितल्याने संतापलेल्या गुंडाने हॉटेल मालकाला शिवीगाळ, हाणामारी केली आणि पाया पडायला लावलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण पूर्वेत गुंड दिनेश लंकेचा हॉटेलमालकावर हल्ला केला आहे.

  • ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • आरोपी काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता.

  • पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याणमध्ये विक्रेता आणि ग्राहकामध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास राडा झाल्याची घटना घडली आहे. हॉटेल मालक बचारामर मोऱ्या यांच्या हॉटेलमध्ये दारूच्या नशेत आलेल्या गावगुंड दिनेश लंके याने हैदोस घातला. बचारामर यांनी दिनेशला थोडावेळ थांबायला सांगितल्याने दिनेशने हॉटलेमालकाला शिवीगाळ तसेच हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. धक्कदायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिनेश एका जुन्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून बाहेर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथील नितीन राज हॉटेलच्या बाजूला असलेल्या वडा-इडलीच्या दुकानावर शनिवारी रात्री सराईत गुन्हेगार दिनेश लंके दारूच्या नशेत आला होता. त्याने हॉटेलचे मालक बचारामर यांच्याकडे 'मला दाल वडा बनवून दे' अशी मागणी केली. हॉटेल मालकांनी लंकेला 'थोडा वेळ थांबा' असे सांगितले. बचारामर यांनी असे सांगितल्याने दिनेशची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने बचारामर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यांनतर परिस्थिती आणखी चिघळली. हॉटेल मालक बचारामर यांनी लंकेच्या कृतीला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराचा प्रतिकार पाहून लंके अधिक आक्रमक झाला. त्याने त्वरित हत्यार काढले आणि ते दुकानदाराला दाखवून धमकावले. या गुंडगिरीपुढे हतबल झालेल्या हॉटेल मालकाला लंकेने चक्क हात जोडून पाया पडायला लावले. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दिनेश लंके हा कल्याण पूर्वेतील सराईत गुन्हेगार असून, काही दिवसांपूर्वीच तो एका जुन्या गुन्ह्यातून जामीनावर सुटून बाहेर आला आहे. पुन्हा एकदा परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी आणि हॉटेल चालक यांच्यात युतीचे वातावरण आहे. यामुळे सराईत गुन्हेगार आणि भाईंवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी दिनेश लंकेचा कसून शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राम मंदिर आंदोलनाचा मुख्य चेहरा काळाच्या पडद्याआड; रामविलास वेदांती यांचं निधन

Maharashtra Live News Update: अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावा

Christmas Look : मैत्रिणींनो! ख्रिसमस आलाय; ऑफिस पार्टीसाठी करा ग्लॅमरस लूक, वाचा फॅशन टिप्स

आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने झडप टाकली, हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू|VIDEO

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियासारखा हॉट अन् बोल्ड लूक हवाय? हे ५ साडी पॅटर्न ट्राय करा

SCROLL FOR NEXT